#Maratha Reservationमुख्यमंत्री ठाकरे, देवेंद्र फडणवीस यांची आज बैठक 

फडणवीस यांनी या आरक्षणाला पूर्ण पाठिंबा दिला होता. स्वतः मुख्यमंत्र्यांनी जनतेशी संवाद साधताना ही बाब स्पष्ट केली होती.
collage (32).jpg
collage (32).jpg

मुंबई : मराठा आरक्षण मुद्दावरून मुख्यमंत्री उद्वव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची आज होणार आहे. दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांच्याशी मराठा आरक्षणाबाबत चर्चा केली होती. फडणवीस यांनी या आरक्षणाला पूर्ण पाठिंबा दिला होता. स्वतः मुख्यमंत्र्यांनी जनतेशी संवाद साधताना ही बाब स्पष्ट केली होती.

दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा केली आहे. देवेंद्र फडणीस मुंबईत येतील, त्या वेळी त्यांच्याशीही चर्चा करण्यात येणार आहे. सगळ्यांना विश्वासात घेऊन अंतिम निर्णय घेऊ. याबाबत कायदेशीर सल्ला घेण्यात आला आहे आणि इतरांकडून मुख्यमंत्र्यांनी याबाबत पर्याय समजून घेतले आहेत, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी काल दिली होती. मराठा आरक्षणासंदर्भात विविध संघटनांनी राज्य सरकारला सूचना केलेल्या आहेत. अंतिम जे काय करायचे असेल, ते कायदेशीर विचार घेऊन केले जाईल. फडणवीस आल्यानंतर त्यांच्याशी देखील चर्चा करण्याची मुख्यमंत्र्यांची भूमिका असल्याचे चव्हाण यांनी नमूद केले होते.

मराठा समाजाच्या न्याय हक्काच्या मागणीसाठी सरकार तसूभरही मागे हटणार नाही. हा लढा आपल्या सर्वांचा आहे. समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी जे जे काही करता येईल ते सर्व करू, असा दिलासा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावर दिला. मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने समाजात त्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

यासंदर्भात आम्ही सर्व संबंधितांनाही विश्वासात घेऊन , त्यांच्या सूचनांचा विचार करणार आहोत. विरोधी पक्ष नेत्यांशी देखील या विषयावर सविस्तर बोलण्यात येईल. सरकार या प्रश्नी सुरुवातीपासून प्रामाणिक आहे आणि तळमळीने हा प्रश्न सोडवू इच्छिते. पण राजकारणासाठी मराठा समाजाला भडकविण्याचे आणि आगी लावण्याचे काम आपण सहन करत कामा नये, असेही आवाहन त्यांनी केले.

मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर त्याचे पडसाद उमटत आहे. खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी याबाबत राज्य सरकारवर टीका केली असून समाजाला विश्वासात घेवून योग्य ती कार्यवाही केली असती तर मराठा आरक्षण कायम टिकवता आले असते, अशी भूमिका मांडली आहे. या स्थगितीवर छत्रपती संभाजीराजे यांनी प्रतिक्रिया दिली होती. मात्र उदयनराजेंचे मत आले नव्हते. त्यांनी ते आज सविस्तरपणे मांडले आहे. याबाबत ते म्हणतात की सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे समाजाच्या प्रगतीला मोठी खिळ बसली आहे. सरकारने समाजाला विश्वासात घेवून योग्य ती कार्यवाही केली असती, तर मराठा आरक्षण कायम टिकवता आले असते. मराठा समाजाच्या प्रश्नांबाबत सरकार कधीच गंभीर नव्हते. त्यामुळे आज त्याचा परिणाम मराठा समाजाला भोगावा लागत आहे. मी सरकारला जाहीर आवाहन करतो. सरकारने तातडीने अध्यादेश काढून मराठा आरक्षण अबाधित ठेवावं. अन्यथा होणाऱ्या परिणामाला सामोरे जावे. कारण मराठा समाज आता एकटा नाही एवढच सांगतो. मी तुमच्या सोबत आहे, असाही इशारा त्यांनी दिला.

मराठा आरक्षणाला मिळालेल्या स्थगितीबाबत आपली भुमिका मांडताना शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उच्च न्यायालयात विधेयक टिकवले. उच्च न्यायालयात जो निर्णय होतो, तो निर्णय सर्वोच्च न्यायालयात सहसा बदलत नाही. मात्र, मराठा आक्षणाबाबत असे का घडले, हा खरा प्रश्‍न आहे. राज्य सरकारने आपली बाजू नीट मांडली नाही, असेच म्हणावे लागेल. हे सरकार नवीन आहे.

मराठा समाजाने आरक्षणासाठी लढा उभारला, मोर्चे काढले. एवढं सगळं करुन जर आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात स्थगिती मिळत असेल तर खूपच दुर्दैवी बाब आहे. त्यामुळे सरकारने स्थगिती उठवण्यासाठी लवकरात लवकर प्रयत्न करावा, अशी मागणी शिवेंद्रसिंहराजे यांनी केली. मराठा आरक्षण हे इतर समाजाचे आरक्षण कमी करुन द्यावे, अशी मागणी नाही आणि तसे घडतही नाही.

 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com