पदवीधरांना काम अन् योग्य दाम मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार : प्रा. सचिन ढवळे - Marathwada Graduate Constituency Will try to get the work of graduates  Prof. Sachin Dhawale | Politics Marathi News - Sarkarnama

पदवीधरांना काम अन् योग्य दाम मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार : प्रा. सचिन ढवळे

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 25 नोव्हेंबर 2020

ही निवडणूक माझी नसून समस्त मराठवाड्यातील गांजलेल्या पिचलेल्या व अनेक वर्षापासून प्रशासनाला कंटाळलेल्या सुशिक्षित सुसंस्कृत पदवीधरांची आहे," असे प्रा. ढवळे यांनी म्हटले आहे.

पुणे : "राज्यात पदवीधरांचे प्रश्‍न बिकट आहेत. रोजगाराचा प्रश्‍न अधिक महत्वाचा आहे. यापुढील काळात हाताला काम आणि योग्य दाम मिळावे, यासाठी आपण लढत राहू," असे मत मराठावाडा पदवीधर मतदारसंघाचे प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार प्रा. सचिन ढवळे यांनी व्यक्त केले.

पदवीधर निवडणूक लढविणाऱ्या जवळपास सर्वच उमेदवारांनी जाहीरनामे प्रसिद्ध केले आहेत. मात्र, प्रा. ढवळे यांच जाहीरनामा या सर्व उमेदवारांच्या आधी जाहीर करण्यात आला आहे. प्रा. ढवळे हे प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार आहेत. पक्षातर्फे प्रा. ढवळे यांच्या निवडणूक प्रचारासाठी यंत्रणा काम करीत आहे. मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यातून प्रा. ढवळे यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. राज्याच्या इतर भागाच्या तुलनेत मराठवाड्यात बेरोजगारीचे प्रमाण अधिक आहे. मोठ्या संख्येने तरूण रोजगारापासून वंचित आहेत. भविष्यात या तरूणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी उद्योग-व्यावसायिकांशी समन्वय साधून काम करण्याचा आपला प्रयत्न राहील, असे प्रा. ढवळे यांनी सांगितले.

उद्योग धंद्याचा अभाव, सततचा दुष्काळ या अशा अनेक कारणाने मराठवाड्यात बेरोजगारीचे प्रमाण खूप वाढले आहे. आपल्याला पदवीधर मतदार संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाल्यास तरुणांना काम व योग्य दाम मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, असेही प्रा. ढवळे यांनी सांगितले. उद्योग-व्यवसाय करण्यासाठी तयार असलेल्या तरूणांना उद्योग व्यवसायासाठी लोन व एका दिवसात सर्व प्रकारचे लायसन मिळावे, यासाठी विधान परिषदेत आवाज उठवणार असल्याचे ही प्रा. ढवळे यांनी सांगितले आहे. 'सरकारनामा'शी बोलताना ते म्हणाले, ‘‘प्रथापित नेत्यांनी केवळ भूलथापा देऊन झुलवत ठेवले आहे. पदवीधर त्यांना केवळ मतदान व मतदार म्हणून वापर करण्या पुरताच वाटतो आहे. परंतु सध्या सर्व सुशिक्षित पदवीधर प्रस्थापित आमदार तसेच धनदांडग्यांच्या विरोधात काम करीत असल्याचे चित्र दिसत आहे.’’

"आपल्याला कोणत्याही प्रकारचे राजकारण करायचे नाही. केवळ पदवीधरांचे असंख्य प्रश्न सोडविण्यासाठी आपण पदवीधरांच्या इच्छेनुसार निवडणूक लढवत आहोत. ही निवडणूक माझी नसून समस्त मराठवाड्यातील गांजलेल्या पिचलेल्या व अनेक वर्षापासून प्रशासनाला कंटाळलेल्या सुशिक्षित सुसंस्कृत पदवीधरांची आहे," असे प्रा. ढवळे यांनी म्हटले आहे.

हेही वाचा : #मराठा आरक्षण : रखडलेले सर्व शैक्षणिक प्रवेश सुरू..
 
मुंबई : मराठा समाजातील मुलांसाठी शैक्षणिक प्रवेशाबद्दल सरकारचा महत्त्वाचा निर्णय घेतसा आहे. मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने रखडलेले सर्व शैक्षणिक प्रवेश सुरू करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. 9 सप्टेंबर 2020 पूर्वी ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज केले आहेत. मात्र, त्यांना प्रवेश देण्यात आलेले नाहीत, अशा SEBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गातून प्रवेश देण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये मराठा आरक्षण याचिकेवर सुनावणी सुरू आहे. या दरम्यान, न्यायाधीश संभाजी शिंदे व न्यायाधीश माधव जामदार यांच्या खंडपीठाने आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्ग बद्दल महत्त्वपूर्ण निर्णय दिला. मराठा समाजातील युवकाना नोकऱ्या आणि शिक्षणामध्ये आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख