मराठा आरक्षण : सरकारच्या तयारीबाबत जाणीवपूर्वक अफवा पसरविल्या जात आहेत

मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन लढाईत राज्य सरकारची बाजू मांडताना मराठा समाजातील सर्व घटकांना विश्वासात घेऊन सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत.
Rumors are being spread about the government's preparations
Rumors are being spread about the government's preparations

मुंबई : मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन लढाईत राज्य सरकारची बाजू मांडताना मराठा समाजातील सर्व घटकांना विश्वासात घेऊन सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत, असे मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. 

उपसमितीने शुक्रवारी (ता. 10 जुलै) सायंकाळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून घेतलेल्या बैठकीत ते बोलत होते. या वेळी खासदार छत्रपती संभाजे राजे, आमदार विनायक मेटे यांच्यासह समाजातील अनेक अभ्यासक, जाणकारांनी आपली भूमिका मांडली. या प्रसंगी समितीचे सदस्य एकनाथ शिंदे, बाळासाहेब थोरात, दिलीप वळसे पाटील, विजय वडेट्टीवार आणि राज्य सरकारचे संबंधित अधिकारी व वकील उपस्थित होते. 

मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन प्रकरणांच्या तयारीबाबत जाणीवपूर्वक अफवा पसरवल्या जात आहेत. परंतु, विधीमंडळाने सर्व सहमतीने मंजूर केलेले मराठा आरक्षण कायम ठेवण्यासाठी राज्य सरकारची भक्कम तयारी असल्याचे चव्हाण यांनी या बैठकीत सांगितले. 

समितीचे सदस्य एकनाथ शिंदे यांनीही या प्रसंगी आपली भूमिका मांडली. समाजाकडून मिळणाऱ्या सहकार्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले. न्यायालयीन लढा जिंकण्यासाठी सरकार कोणतीही कसूर ठेवणार नाही, असे अभिवचन त्यांनी दिले. 

दिलीप वळसे पाटील यांनी या प्रसंगी बोलताना मराठा आरक्षण कायम ठेवण्यासाठी समाजातील सर्व घटकांचे सहकार्य या पुढेही घेतले जाईल, असे सांगितले. बाळासाहेब थोरात यांनी या बैठकीतून अनेक चांगले मुद्दे समोर आल्याचे सांगितले. या मुद्यावर असलेली एकजूट पाहता मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयातही निश्‍चितपणे कायम राहील, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

हा मराठा समाजाचा विजय...

पुणे :   मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकासासाठी कार्यरत ‘सारथी’ संस्थेला 8 कोटी रुपयांचा निधी देत असल्याचे पत्रकार परिषदेत जाहीर केल्यानंतर अवघ्या दोन तासातंच हा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. तसे पत्र ‘सारथी’ संस्थेला पाठवण्यात आले आहे. या निर्णयानंतर संभाजीराजें यांनी एक टि्वट केले आहे.

त्या टि्वटमध्ये संभाजीराजें म्हणतात, ''दोन तासात 8 कोटी रुपयाचा निधी मिळवता आला. सर्व मागण्या मान्य करून घेता आल्या. ही समाजाची ताकद आहे. हा मराठा समाजाचा विजय आहे. समाजात एकी असली की सर्व काही करून घेता येतं. स्वायत्त आणि सक्षम सारथी गरीब मराठा समाजातील गुणवंत युवकांच्या जीवनात क्रांती घडवेल.'' 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल सकाळी 11 वाजता मंत्रालयातील त्यांच्या दालनात खासदार छत्रपती संभाजीराजे व मराठा समाज प्रतिनिधींची बैठक घेतली. उपमुख्यमंत्री अजित पवार हे निर्णयक्षमता व झपाट्याने काम करण्यासाठी ओळखले जातात. ते पुन्हा सिद्ध झाले आहे. काल दुपारी दीड वाजता पत्रकार परिषदेत 8 कोटी देणार असल्याचे जाहीर केले. त्यानंतर अवघ्या दोन तासात म्हणजे साडेतीन वाजण्याच्या सुमारास इतर मागास बहुजन कल्याण विभागातर्फे पत्र  पाठविण्यात आले आहे. त्याद्वारे सुमारे 7 कोटी 94 लाख 89 हजार 238 रुपये इतका निधी ‘सारथी’ संस्थेला तातडीने उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

Edited By : Vijay Dudhale 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com