ओहटी असल्याने हिरेन यांचा मृतदेह गाळात रूतला...

हिरेन मृत्यूप्रकरणाचा तपास एटीएसने घेतल्यानंतर तपासाची चक्र वेगाने फिरत आहे.
hiren.jpg
hiren.jpg

मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली स्काँर्पिओ कार सापडली होती. या गाडीचे मालक मनसुख हिरेन याच्या मृत्यूप्रकरणी एटीएस (ATS) आता तपास करीत आहे. या तपासाचा भाग म्हणून १०, आणि ११ मार्चच्या राञी एटीएसच्या पथकाने मुंब्रा रेतीबंदर येथे 'क्राइम सीन'चे प्रात्याक्षिक करून पाहिले.

एटीएसच्या सूञांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या वेळी हे 'क्राइम सीन'चे प्रात्याक्षिक करण्यात आले. त्यावेळी घटनास्थळी एटीएसचे अधिकारी आणि न्यायवैद्यक प्रयोग शाळेचे अधिकारीही उपस्थित होते. स्थानिक मच्छीमारांना समुद्रातील पाण्याचा अंदाज असल्याने पोलिसांनी हे प्रात्याक्षिक करताना त्याचीही मदत घेतली. हे प्रात्याक्षिक करण्यापूर्वी पोलिसांनी समुद्रातील भरती आणि ओहटी सांगणाऱ्या पालिकेच्या तज्ज्ञांची मदत घेतली.

ज्या दिवशी मनसूखने आत्महत्या केली. ता. ४ व ५ रोजी भरती आणि ओहटीची वेळ काय होती. हे पाहिलं. त्याप्रमाणे १० आणि ११ मार्चच्या मध्यराञी भरती आणि ओहटीची वेळ सारखी असल्याने ATS पोलिसांनी या दिवशी 'क्राइम सीन' चे प्रात्याक्षिक केल्याचं सांगितलं जात आहे.

हिरेन मृत्यूप्रकरणाचा तपास एटीएसने घेतल्यानंतर तपासाची चक्र वेगाने फिरत आहे. ज्याने कुणी हिरेनचा हत्या केली आहे. त्याने हिरेन यांना फेकताना, समुद्रातील भरती-ओहटीच्या वेळेची त्याला माहित नव्हती. त्यामुळे त्याचा असा समज झाला असावा की, समुद्रात बाँडी फेकल्यानंतर ती पुढे वाहून जाईल, असा संशय पोलिसांना आहे. माञ आरोपीने हिरेन यांचा मृतदेह फेकला. त्यावेळी ओहटी असल्याने त्यांचा मृतदेह हा पाण्यातून वाहून न जाता, गाळात रुतल्याचं सांगितलं जात आहे. 

त्याचबरोबर त्या परिसरात सूञांच्या माहितीनुसार मृतदेह सापडलेल्या परिसरात मोठ्या प्रमाणात कांदळवनाचा झाडं आहेत. त्यामुळे मृतदेह वाहत पुढे जाणं शक्य नसल्याचं तेथील स्थानिकांच मत असल्याचं निरीक्षणही नोंदवण्यात आलं असल्याचं कळतयं. 

हा क्राइम सीन करण्यासाठी ATS पोलिसांनी मनसुख हिरेन याच्या वजनाचा आणि उंचीचा पुतळा बनवून तो फेकून गुन्ह्याचा अभ्यास केला. तर दुसरीकडे ATS च्या दुसऱ्या टिमने दक्षिण मुंबईतील एका गँरेज मालकाचा जबाब नोंदवल्याचे कळतयं. पोलिसांना असा संशय आहे की, त्या स्फोटकांनी भरलेल्या अवस्थेत सापडलेल्या स्काँर्पिओ कारचा चेसी आणि इंजीननंबर हा त्या गँरेजमध्ये खोडण्याचा प्रयत्न केला आहे. हा चेसी नंबर मोडल्या प्रकरणी ATS ने एका गँरेज मालकाचा जबाब नोंदवल़्याची माहिती सूञांनी दिली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com