मनोहर जोशी यांच्या पत्नी अनघा जोशी यांचे निधन

मनोहर जोशी यांच्या पत्नी अनघा जोशी (वय75) यांचे आज पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले.
AnaghaNEWF.jpg
AnaghaNEWF.jpg

मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांच्या पत्नी अनघा जोशी (वय75) यांचे आज पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे पती मनोहर जोशी, मुलगा उन्मेष जोशी, अस्मिता आणि नम्रता या दोन मुली, जावई गिरीश व्यास असा परिवार आहे. 

अनघा यांच्या जन्म 2 जानेवारी 1945 रोजी झाला होता. त्यांचे माहेरचे नाव मंगल हिरवे आहे.  ता. 14 मे 1964 रोजी अनघा यांचा मनोहर जोशी यांच्याशी विवाह झाला. अनघा जोशी यांनी मनोहर जोशी यांच्या सामाजिक, राजकीय जीवनात मोलाची साथ राहिली.

विवाहानंतरच मनोहर जोशी यांनी राजकारणात प्रवेश केला. मनोहर जोशी हे दादरमधून मुंबई महापालिकेत 1968 मध्ये निवडून आले. मुंबई महापैार, आमदार, मुख्यमंत्री, खासदार, केंद्रीय मंत्री, लोकसभेचे अध्यक्ष, राज्यसभा सदस्य असा मनोहर जोशी यांचा राजकीय जीवनपट आहे. युती सरकारमध्ये ते मुख्यमंत्री झाले. मनोहर जोशी हे शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री आहेत. 


हेही वाचा : ठाकरे सरकार पाच वर्षे टिकणारच, थोरातांचे राज ठाकरेंना उत्तर 
 
मुंबई : महाविकास आघाडी सरकारबाबत बोलताना हे सरकार जास्त काळ टिकणार नाही असे राज ठाकरे म्हणतात.मात्र ते कशाच्या आधारे ही भविष्यवाणी करतात,असा सवाल कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज एका वृत्तवाहिनीशी बोलताना केला आहे. एकीकडे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस हे ही ठाकरे सरकारवर टीका करीत असतात. आपआपसातील मतभेदामुळे हे सरकार कोसळेल असे ते सांगत आहेत. तर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील शिवसेनेविषयी आशावादी आहेत. मात्र जे फडणवीस सांगत आहेत ते आता राज ठाकरेही सांगत आहे. हे सरकारच टीकणार नाही असा त्यांचा दावा आहे. राज ठाकरेंच्या टीकेचा समाचार थोरात यांनी घेतला आहे. ते म्हणाले, की ठाकरे सरकार आपला पाच वर्षाचा कालावधी पूर्ण करेल,असा मला आत्मविश्वास आहे. सरकार जास्त काळ टिकणार नाही. अशी भविष्यवाणी राज ठाकरे हे कशाच्या आधारे करतात, हेच मला समजत नाही. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com