राजस्थाननंतर आता महाराष्ट्र सरकार अस्थिर होणार, गिरीश महाजन दिल्लीला रवाना

राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडण्याबाबत राजकीय चर्चा सुरू असतानाच भाजपचे नेते गिरीश महाजन आज तातडीने दिल्लीला रवाना झाल्याचे सांगण्यात येत आहे.
major happening in maharashtra politics girish mahajan on Delhi tour
major happening in maharashtra politics girish mahajan on Delhi tour

जळगाव : राजस्थानमध्ये सरकार बदलाच्या जोरदार घडमोडी सुरू आहेत. महाराष्ट्रातही महाविकास आघाडी सरकार पाडण्याबाबतच्या चर्चा सुरू आहेत. अशा स्थितीत राज्याचे माजी मंत्री गिरीश महाजन तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत. त्यामुळे राज्याच्या राजकारणातही घडमोडी घडणार काय? याची चर्चा सुरू झाली आहे.

राजस्थानमधील कॉंग्रेस सरकारमध्ये जोरदार नाराजी नाट्य सुरू आहे. दिल्लीत त्याच्या राजकीय घडामोडी घडत आहेत. कर्नाटक, मध्यप्रदेशमधील कॉग्रेसचे सरकार पडल्यानंतर राजस्थानचे सरकार कोसळण्यासाठी सर्व प्रयत्न सुरू आहेत. त्यानंतर महाराष्ट्राचे सरकार खेचण्यासाठी हालचाली होवू शकतात. कारण महाराष्ट्रातही भाजपतेर सरकार आहे. या ठिकाणी शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी असे तीन पक्षांचे महाविकास आघाडीचे सरकार आहे. राजस्थानमधील सुरू झालेल्या जोरदार घडामोडमुळे आता महाराष्ट्रातही सरकार पडण्याबाबत राजकीय चर्चा सुरू झाली आहे. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी हे सरकार पाडून दाखवाच असे भाजपला आव्हानही दिले आहे. तर कॉंग्रेसचे नेते व राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनीही राजस्थाननंतर महाराष्ट्रातही सरकार पाडण्याचा प्रयत्न होवू शकतो, मात्र तो यशस्वी होवू देणार नाही असा विश्‍वास व्यक्त केला आहे.

राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडण्याबाबत राजकीय चर्चा सुरू असतानाच भाजपचे नेते गिरीश महाजन आज तातडीने दिल्लीला रवाना झाल्याचे सांगण्यात येत आहे. गिरीश महाजन काल (ता.१२) जामनेरहून मुंबईला तातडीने रवाना झाले. तेथून आज दुपारी ते दिल्लीला रवाना झाल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत महाजन यांच्याशी संपर्क साधला असता, आपण मुंबईत असून दिल्ली येथे जात असल्याचे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्रात युतीचे सरकार असताना गिरीश महाजन हे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विश्‍वासातील मंत्री म्हणून ओळखले जात होते. आता विरोधी पक्षात असतांनाही ते फडणवीस यांचे विश्‍वासू म्हणून ओळखले जातात. फडणवीस यांनी अजित पवारांसोबत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली त्यावेळी गिरीश महाजन राजभवनात त्यांच्या सोबत होते. फडणवीस यांनी नुकताच काही जिल्ह्याचा दौरा केला त्यावेळी महाजन त्यांच्या सोबतच होते. त्यामुळे राजस्थानच्या राजकीय घडामोडी दिल्लीत सुरू असतांना गिरीश महाजन यांची अचानक दिल्लीवारी का होत आहे, याविषयी विविध तर्क लावले जात आहेत.

गिरीश महाजन काल (ता.१२) जामनेरहून मुंबईला तातडीने रवाना झाले. तेथून आज दुपारी ते दिल्लीला रवाना झाल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत महाजन यांच्याशी संपर्क साधला असता, आपण मुंबईत असून दिल्ली येथे जात असल्याचे त्यांनी सांगितले.

Edited by swarup jankar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com