नावातच विकास असलेले महाविकास आघाडी सरकार संवेदनशील.. - Mahavikas Aghadi government with development in name only is sensitive | Politics Marathi News - Sarkarnama

नावातच विकास असलेले महाविकास आघाडी सरकार संवेदनशील..

जगदीश पानसरे
रविवार, 22 नोव्हेंबर 2020

केवळ निवडणूक आली की तुमच्या कडे मतं मागायला यायचं अस हे सरकार नाही. एक संवेदनशील सरकार आता राज्यात सत्तेवर आहे. त्यामुळे तुमचे प्रश्न सोडवण्याचा निश्चितच प्रामाणिक प्रयत्न केले जातील. पदवीधरांचे काही प्रश्न सुटल तर काही अजून शिल्लक आहेत. अजून चार वर्ष आहेत, त्यापुढच्या अनेक वर्ष देखील आपल्याला काम करण्याची संधी आहे, असा विश्वास देखील मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

औरंगाबाद ः राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्येच विकास आहे, त्यामुळे हे सरकार केवळ निवडणुका आल्या की मत मागायला येणारे सरकार नाही, तर संवेदनशीलपणे तुमचे प्रश्न सोडवणारे आहे. त्यामुळे राज्यात तीन वेगवेगळ्या विचारांचे सरकार सत्तेवर आल्यानंतरची ही पहिलीच पदवीधरांची निवडणूक महत्वाची आहे. सतीश चव्हाण यांचा विधिमंडळातील अनुभव खूप मोठा आहे, त्यांच्या प्रभावी कामाची व महाविकास आघाडी सरकारने गेल्या वर्षभरात केलेल्या कामाची पावती देणारी ही निवडणूक आहे. मतदार तुम्हाला नक्कीच पुन्हा संधी देतील, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्र्यांनी आज फेसबुक लाईव्हद्वारे मतदार आणि महाविकास आघाडीच्या पदाधिकरी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्त्यांशी संवाद साधला. कोरोनाच्या काळात जी काही काम करण्याची संधी मिळाली, त्यामध्ये उद्योग आणि शिक्षणाची सांगड घालत आपण वाटचाल करत आहोत असे स्पष्ट करतांनाच उद्धव ठाकरे यांनी सतीश चव्हाण यांच्या विधिमंडळातील अनुभव आणि कामाची प्रशंसा केली.

उद्धव ठाकरे म्हणाले, आधी एकमेकांचे विरोधक असलेले, विचार न जुळणारे तीन पक्ष राज्यात सत्तेवर आले. पण मागचं सगळ विसरून महाविकास आघाडी सरकार राज्यामध्ये भक्कमपणे जनतेच्या हिताची कामे करत आहे. मला कुठलाही राजकीय अनुभव नसतांना मी मुख्यमंत्री झालाे आणि काॅंग्रेस-राष्ट्रवादीसह सगळ्यांनीच मला पाठिंबा दिला, सहकार्य केल. त्यामुळेच कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यात आपला सर्वाधिक वेळ गेला असला तरी आपण इतर विकासाची कामे थांबवली नाही.

प्रामुख्याने उद्योग क्षेत्रात आपण गेल्या ८-९ महिन्यांमध्ये ५० हजार कोटीहून अधिकचे सामंजस्य करार केले. या उद्योग कंपन्यांना जमीनींचे वाटप आदी ६० टक्के कामे आधीच पुर्ण झाली होती. पण उर्वरित कामे देखील आपण कोरोनाच्या कामात पुर्ण करून हे उद्योग लवकरात लवकर कसे उभे राहतील, त्यातून नवीत तरूण पदवीधरांच्या हाताला काम कसे मिळेल यासाठी प्रयत्न केले.

शेवटी उद्योग कुणासाठी तर तरुण, पदवीधरांसाठी. त्यांना नोकरी, उद्योग मिळाले तर त्यांच्या पदवीला महत्व, त्यासाठीच आपण पदवी घेतो. त्यामुळे केवळ निवडणूक आली की तुमच्या कडे मतं मागायला यायचं अस हे सरकार नाही. एक संवेदनशील सरकार आता राज्यात सत्तेवर आहे. त्यामुळे तुमचे प्रश्न सोडवण्याचा निश्चितच प्रामाणिक प्रयत्न केले जातील. पदवीधरांचे काही प्रश्न सुटल तर काही अजून शिल्लक आहेत. अजून चार वर्ष आहेत, त्यापुढच्या अनेक वर्ष देखील आपल्याला काम करण्याची संधी आहे, असा विश्वास देखील मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

चव्हाण यांचा अनुभव दाडंगा..

सतीश चव्हाण हे नवखे नाहीत, त्यामुळे त्यांनी नव्याने ओळख करून देण्याची गरज नाही. विधिमंडळातील त्यांचा अनुभव खूप मोठा आहे. त्यांनी पदवीधरांचे अनेक प्रश्न मांडले आणि सोडवले, त्यामुळे मतदार त्यांना पुन्हा निश्चितच संधी देतील आणि प्रचंड मतांनी विजयी करतील यात मला शंका नाही. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी, काॅंग्रेस आणि शिवसेनेचे सर्वच लोकप्रतिनिधी व शिवसैनिक भक्कमपणे तुमच्या पाठीशी उभे आहेत, अशी ग्वाही देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख