कोरोना रोखण्यास सरकार अपयशी...केंद्रीय आरोग्य सचिवांची नाराजी..

हाँटस्पाँट, कंटेन्मेंट झोनमध्ये प्रशासकीय यंत्रणा अधिक मजबूत करा, असे राजेश भूषण यांनी राज्य सरकारला सूचविले आहे.
sk16.jpg
sk16.jpg

मुंबई : राज्यात कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होत असून दुसऱ्या लाटेला सुरवात झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्रात वेगाने वाढत असलेल्या कोरोनाबाबत केंद्रीय आरोग्य सचिवांनी राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आहे. राज्यात कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकार अपयशी ठरले, असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. 

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना पत्र लिहून कोरोना रोखण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा मजबूत करण्याचा सल्ला दिला आहे. हाँटस्पाँट, कंटेन्मेंट झोनमध्ये प्रशासकीय यंत्रणा अधिक मजबूत करा, असे राजेश भूषण यांनी राज्य सरकारला सूचविले आहे. कोरोनाग्रस्त रूग्ण, कोरोनाची चाचणी आणि क्वारंटाइन सेंटर आदीबाबत प्रशासनाने अधिक लक्ष देणे गरजेच आहे, असे त्यांनी पत्रात नमूद केलं आहे. कोरोनाची लागण झालेल्या प्रत्येक रूग्णांच्या संपर्कात आलेल्या 20 ते 30 जणांचा शोध घेऊन त्यांची तपासणी करा, असेही त्यांनी सूचविले आहे. 

राज्यात सध्या काही जिल्ह्यात सुरू असलेल्या लाँकडाउनबाबत राजेश भूषण यांनी नाराजी व्यक्त केली आहे. संबधित ठिकाणी कठोर लाँकडाउन करण्याची गरज आहे, उपाययोजना प्रभावीपणे राबवा, असे त्यांनी पत्रात नमूद केलं आहे. राज्यात सोमवारी सुमारे 15 हजार नवे कोरोना पाँझिटिव्ह आढळले आहेत. काल 48 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.  

पुणे जिल्ह्यात ६३ हॉटस्पॉट

पुणे जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रात आजपर्यंत (ता.१६) एकूण ७६ हजार ५६४ रुग्ण आढळले आहेत. एकूण रुग्णांपैकी ७२ हजार ५९४ जण कोरोनामुक्त झाले आहेत. याशिवाय १ हजार ६६३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ग्रामीण भागात कोरोनाचे ६३ हॉटस्पॉट आहेत. यापैकी  ५२ हॉटस्पॉट हे ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रात तर, उर्वरित अकरा हॉटस्पॉट हे नगरपालिकांमध्ये आहेत. हॉटस्पॉट असलेल्या नगरपालिकांत बारामती, दौंड. इंदापूर, आळंदी, चाकण, राजगुरुनगर, तळेगाव दाभाडे, सासवड,जुन्नर, लोणावळा आणि शिरूर या नगरपालिकांचा समावेश आहे.हॉटस्पॉट बनलेल्या गावांमध्ये घोडेगाव, म्हाळुंगे पडवळ अवसरी खुर्द, मंचर (सर्व ता. आंबेगाव), माळेगाव बुद्रूक, पणदरे, गुणवडी,मोरगांव (ता. बारामती), नसरापूर (भोर), कुरकुंभ, यवत, गोपाळवाडी, लिंगाळी, केडगाव (ता. दौंड), देहू, नांदेड, नऱ्हे, लोणी काळभोर, मांजरी बुद्रूक, कदमवाकवस्ती, कोंढवे-धावडे, उरुळीकांचन, वाघोली,केसनंद, आव्हाळवाडी (ता. हवेली), भिगवण, निरगुडे, अकोले, पिंपळे (ता.इंदापूर), नारायणगाव, वारूळवाडी, ओतूर, उंब्रज (ता. जुन्नर), कुरुळी, मेदनकरवाडी, निघोजे (ता. खेड), कामशेत (ता. मावळ), बावधन, भूगाव, हिंजवडी, माण, म्हाळुंगे, मारुंजी, सूस (ता. मुळशी), कोळविहिरे, पिंपरे खुर्द (ता.पुरंदर), तळेगाव ढमढेरे, रांजणगाव गणपती, मांडवगण फराटा, न्हावरा आणि शिरूर ग्रामीण (ता. शिरूर) आदींचा समावेश आहे.

 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com