राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका आणखी तीन महिने लांबणीवर

मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात महाराष्ट्रात कोरोनाचे रूग्ण आढळल्यानंतर शासनाने तातडीने पावले उचलत राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका 3 महिन्यांनी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता.
Maharashtra government extend term of cooperative bodies for three months
Maharashtra government extend term of cooperative bodies for three months

मुंबई: कोरोना संसर्गाच्या पार्श्वभमुीवर राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय मार्चमध्ये घेण्यात आला होता. मात्र अजूनही संसर्ग आटोक्यात न आल्याने पुन्हा तीन महिन्यांसाठी या निवडणुका लांबणीवर टाकण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

यासंदर्भाने आज सहकार विभागाने शासन आदेश प्रसिद्ध केला आहे. मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात महाराष्ट्रात कोरोनाचे रूग्ण आढळल्यानंतर शासनाने तातडीने पावले उचलत राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका 3 महिन्यांनी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय 18 मार्चला घेण्यात आला होता. 18 जूनला या आदेशाची मुदत संपणार होती, त्यामुळे एक दिवस आधी राज्य शासनाने मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा फायदा सत्तेवर असलेल्या संचालक मंडळांना होणार आहे.

राज्यातील अनेक कारखाने, सूतगिरण्या, दूध संघ, जिल्हा बँकांच्या संचालक मंडळाची मुदत संपलेली आहे, मात्र कोरोना संसर्गामुळे या संचालक मंडळांना एकूण सहा महिन्याची मुदतवाढ मिळणार आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळ दूध संघाची निवडणूक ही नेहमी चर्चेची असते. या निवडणुकीची दोन्ही गटांनी तयारी केली होती. मात्र त्यांना आता आणखी तीन महिने वाट पहावी लागणार आहे.

कोरोनाच्या उपाययोजनांमध्ये महाराष्ट्र जगाच्या मागे नाही तर पुढे आहे : उद्धव ठाकरे
मुंबई : कोरोनाच्या उपाययोजनांसाठी आरोग्य सुविधांची उभारणी करताना मुंबईत मोकळ्या मैदानावरील क्षेत्रीय रुग्णालयात अतिदक्षता विभागाचे (आयसीयू) बेडस निर्माण करण्याची किमया यंत्रणांनी केली आहे. महाराष्ट्राने देशासमोर अभिनव अशी यशोगाथा मांडली आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे काढले.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) यांच्यावतीने बीकेसी मैदानावर दुसऱ्या टप्प्यात उभारण्यात आलेल्या कोरोना रुग्णालयाचा हस्तांतरण कार्यक्रम आणि ठाणे येथे उभारण्यात आलेल्या १००० खाटांचे कोरोना रुग्णालयाचा ई-लोकार्पण सोहळा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आर. ए. राजीव, मुंबई महापालिका आयुक्त आय. एस. चहल आदी मान्यवर सहभागी झाले होते.

मुख्यमंत्री श्री. ठाकरे यावेळी म्हणाले, बीकेसी मैदान आणि ठाणे येथे ही दोन्ही रुग्णालये युद्ध पातळीवर उभारण्यात आली आहेत, याचा मला अभिमान आहे. कोरोनाच्या उपाययोजनांमध्ये महाराष्ट्र जगाच्या मागे नाही तर पुढे आहे. गेल्या दोन महिन्यांच्या कालावधीत मुंबईसह राज्यात काही लाख खाटा उपचारासाठी निर्माण केल्या गेल्या ही मोठी गोष्ट आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com