शिवसेनेच्या माजी शहराध्यक्षाची गोळ्या झाडून हत्या  - Lonavla city Former Shiv Sena city president Rahul Umesh Shetty murder | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

उर्मिला मातोंडकर मातोश्रीवर दाखल
बिग बॉस फेम अभिजित बिचुकलेंचे नाव मतदार यादीतून गायब झाले आहे. त्यामुळे ही निवडणुक प्रक्रियाच रद्द करावी, अशी मागणी निवडणुक आयोगाकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

शिवसेनेच्या माजी शहराध्यक्षाची गोळ्या झाडून हत्या 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 26 ऑक्टोबर 2020

लोणावळा शहर शिवसेनेचे माजी शहराध्यक्ष राहुल उमेश शेट्टी (वय ३८) यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.

लोणावळा (पुणे) : लोणावळा शहर शिवसेनेचे माजी शहराध्यक्ष राहुल उमेश शेट्टी (वय ३८) यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. आज जयचंद चौक येथील त्यांच्या कार्यालयाजवळ सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडत तसेच धारदार शस्त्राने वार करत शेट्टी यांची हत्या केली.  

राहुल शेट्टी यांच्या हत्येने लोणावळा परिसरात सकाळी तणावाचे वातावरण होते. शेट्टी यांच्याबरोबर त्यांचा सहकारी गणेश नायडू याची काल रात्री खून करण्यात आल्याची घटना घडली आहे. एकाच दिवशी हत्येच्या लागोपाठ दोन घटनांनी लोणावळा पुन्हा एकदा हादरले आहे. 
  
जयचंद चौक हा अत्यंत वर्दळीचा चैाक आहे. आज सकाळी या ठिकाणी भर चौकात ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. शेट्टी यांच्याबरोबर त्यांचा सहकारी गणेश नायडू याची रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास हनुमान टेकडी येथे अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने वार करत खून करण्यात आल्याची घटना घडली आहे. लोणावळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. तपास सुरू केला आहे.

संबंधित लेख