लॉकडाउनबाबत मुख्यमंत्र्यांची आज महत्त्वपूर्ण बैठक - lockdown Chief Minister will hold an important meeting today  | Politics Marathi News - Sarkarnama

लॉकडाउनबाबत मुख्यमंत्र्यांची आज महत्त्वपूर्ण बैठक

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 23 मार्च 2021

पुणे, नाशिक, मुंबई येथे रूग्णांच्या वाढता आकडा लक्षात या ठिकाणी लाँकडाउनची शक्यता नाकारता येते नाही. 

मुंबई : राज्यात कोरोनाची आकडेवारी दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे सरकार आणि प्रशासनाची चिंता वाढली आहे. कोरोना गेल्याचा समज, सार्वजनिक ठिकाणी होणार गर्दी, नागरिकांचा बेजबाबदारपणा यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आज महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत कोरोनाचा सामना करण्यासाठी पुढची रणनीती आखली जाऊ शकते.
पुणे, नाशिक, मुंबई येथे रूग्णांच्या वाढता आकडा लक्षात या ठिकाणी लाँकडाउनची शक्यता नाकारता येते नाही. 

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कालच राज्यातील लाँकडाउनबाबतचे संकेत दिले आहेत. कोरोनाचे रुग्ण वाढत असतील तर काही शहरांमध्ये लॉकडाऊन करावा लागेल. या आज मुद्द्यावर आरोग्यमंत्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करणार आहेत. राज्यात कडक निर्बंध लावायचे किंवा लॉकडाउनचा निर्णय याबाबत चर्चा होऊ शकते. लॉकडाऊन टाळायचे असेल तर कोरोनासंबंधीच्या नियमांचे पालन नागरिकांना करावे लागेल

जिल्ह्यात ४३२१ नवे बाधित, ३३ रुग्णांचा मृत्यू
पुणे शहरात सोमवारी (ता. २२) दिवसभरात २ हजार ३४२ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यातील एका दिवसातील एकूण नवीनकोरोनाबाधितांची संख्या ४ हजार ३२१ वर गेली आहे. जिल्ह्यात आज ३३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण मृत्यूमध्ये शहरातील १५ रुग्णांचा
समावेश आहे.काल शहरातील सर्वाधिक रुग्णांपाठोपाठ पिंपरी चिंचवडमध्ये १ हजार १८७,जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात ५६७, नगरपालिका क्षेत्र १७१ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात ५४ रुग्ण सापडले आहेत. दरम्यान, दिवसात ३ हजार ३०८ कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनामुक्त रुग्णांत शहरातील १ हजार ७८९, पिंपरी चिंचवडमधील ८४६, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील ६०४, नगरपालिका हद्दीतील५५ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील १४ जण आहेत.सद्यःस्थितीत जिल्ह्यात ४० हजार ९२ सक्रिय (ॲक्टिव्ह) रुग्ण आहेत. यापैकी ८ हजार ४११ रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार चालू आहेत. उर्वरित ३१ हजार ६८१ जणांना गृहविलगीकरण करण्यात आले आहे. विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांमध्ये शहरातील २ हजार ९४२, पिंपरी चिंचवडमधील १ हजार ८८३, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील २ हजार ६४२, नगरपालिका हद्दीतील ६८२ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील२६२ रुग्ण आहेत. दिवसभरातील एकूण मृत्यूमध्ये शहरातील सर्वाधिक १५ रुग्णांबरोबरच पिंपरी चिंचवडमधील ११, जिल्हा परिषद हद्दीतील पाच आणि नगरपालिका व कॅंटोन्मेंटबोर्ड क्षेत्रातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख