राज्यपालांना रझा अकादमीचं पत्र..राजभवनातील मशीद नमाजासाठी खुली करा.. - Letter of Raza Academy to the Governor  Open the mosque in Raj Bhavan for prayers | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मराठा आरक्षणासंदर्भात उमुख्यमंत्री अजित पवार राजभवनावर दाखल : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही थोड्याच वेळात पोचणार

राज्यपालांना रझा अकादमीचं पत्र..राजभवनातील मशीद नमाजासाठी खुली करा..

सरकारनामा ब्युरो
रविवार, 22 नोव्हेंबर 2020

रझा अकादमीनं पाठवलेल्या पत्रामुळे राज्यपाल आता काय निर्णय घेतात याकडे सर्वाचं लक्ष लागून राहिलं आहे.

मुंबई : आंदोलन, मोर्चानंतर राज्यातील धार्मिकस्थळं उघडी झाली आहेत. राजभवनातील मशीद देखील नमाजासाठी उघडण्याची मागणी रझा अकादमीनं केली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना रजा अकादमीने एक पत्रं लिहिले आहे. 

राज्यातील सर्वच धार्मिकस्थळं 23 मार्चपासून बंद होती. ता. 16 नोव्हेंबर रोजी पुन्हा धार्मिकस्थळं सुरू करण्यात आली. त्यामुळे रजा अकादमीचे महासचिव सईद नुरी यांनी राज्यपालांना एक पत्रं लिहून राजभवनातील मशीद नमाज पठणासाठी सुरु करण्याची विनंती केली आहे. रझा अकादमीनं पाठवलेल्या पत्रामुळे राज्यपाल आता काय निर्णय घेतात याकडे सर्वाचं लक्ष लागून राहिलं आहे. ‘हिंदुस्थान टाइम्स’नं याबद्दल वृत्त दिलं आहे.  

धार्मिकस्थळांच्या समित्या आणि संस्थानांनी कोरोना नियमाचं काटेकोर पालन करण्यावर भर दिला आहे. राजभवनातील कर्मचारी राजभवनातील मशिदीत सामान्य लोकांना नमाज पठणासाठी येऊ देत नाही. आता धार्मिकस्थळं उघडी करण्यात आल्याने या सर्वसामान्य जनतेला नमाज पठणाची परवानगी देण्यात यावी, अशी विनंती रझा अकादमीकडून या पत्रात करण्यात आली आहे. या विषयी राजभवनातील प्रशासनाने बोलण्यास नकार दिला आहे. 

राजभवनामध्ये कोणतीही मशीद नसल्याचं सूत्रांच्या या वृत्तात म्हटले आहे. मुस्लीम कर्मचाऱ्यांना नमाज पठण करता यावं म्हणून स्टाफ क्वार्टरमधील एक रुम उघडी करून देण्यात आलेली होती. त्यामुळे बाहेरून येणारे इतर सामान्य नागरिकही येथे नमाज पठण करायचे. त्यामुळे या ठिकाणी हळूहळू गर्दी वाढायला लागली होती. शुक्रवारी बाहेरील लोक येथे नमाजासाठी यायचे. परंतु, करोनाच्या काळात गर्दी वाढत असल्यानं सर्वसामान्य नागरिकांना आत प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली होती, असं सूत्रांनी सांगितल्याचं वृत्तात म्हटलं आहे.

हेही वाचा : ‘सोमवारी भेटूच शॉकसाठी तयार राहा’...मनसेचे माहीम, दादरमध्ये होर्डिंग मुंबई : 'वाढीव वीज बिल भरू नका,' असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नागरिकांना केलं आहे. वाढीव बिलाबाबत सरकारने दिलेला शब्द पाळला नाही, हा महाराष्ट्रातील जनतेचा विश्वासघात आहे. वाढीव बिलाबाबत राज्य सरकारनं सोमवारपर्यंत (ता.23) निर्णय घ्यावा, अनथा मनसेतर्फे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी दिला आहे. वीजबिल माफीच्या विरोधात मनसेने दंड थोपाटले आहेत. वाढीव वीजबिलाबाबत मनसे आक्रमक झाली आहे. सोमवारनंतर वीज दरवाढी विरोधात आंदोलन करण्याचा निर्धारच मनसेने केला आहे. दरवाढी विरोधात संपूर्ण दादर-माहीम परिसरात होर्डिंगबाजी केली आहे. मनसेनेचे विभाग प्रमुख यशवंत किल्लेदार यांनी हे होर्डिंग लावले आहेत.  
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख