Land Acquisition Track of Pune-Nashik Semi High Speed ​​Railway ... | Sarkarnama

पुणे- नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेमार्गाचे भूसंपादन ट्रॅकवर...

राजेंद्र सांडभोर
बुधवार, 8 जुलै 2020

पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेमार्गाची भूसंपादन प्रक्रिया सुरु झाली आहे. महारेल या केंद्र सरकारच्या संयुक्त भागीदारीतून स्थापन झालेल्या कंपनीने, पुणे, नाशिक व अहमदनगर या जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना, विशेष भूसंपादन अधिकारी नेमण्याची सूचना दिली असल्याचे शिवसेना उपनेते व शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली. 

राजगुरूनगर : पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेमार्गाची भूसंपादन प्रक्रिया सुरु झाली आहे. महारेल या केंद्र सरकारच्या संयुक्त भागीदारीतून स्थापन झालेल्या कंपनीने, पुणे, नाशिक व अहमदनगर या जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना, विशेष भूसंपादन अधिकारी नेमण्याची सूचना दिली असल्याचे शिवसेना उपनेते व शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली. 

राज्य सरकारने या २० टक्के निधीची म्हणजेच ३२०८ कोटी खर्चाची तयारी दर्शवून केंद्रीय रेल्वे बोर्डाला याबाबतची हमी द्यावी यासाठी माझा मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा सुरु आहे. स्वतः मुख्यमंत्री या प्रकल्पासाठी सकारात्मक असून राज्य शासन हा खर्च करण्यास मंजुरी देईल असा विश्वास यावेळी आढळराव पाटील यांनी व्यक्त केला. 

केंद्रीय रेल्वे बोर्डाचे संचालक डी. के. मिश्रा यांनी महाराष्ट्र राज्याच्या प्रधान सचिवांना या प्रकल्पासाठी लागणाऱ्या निधीपैकी २० टक्के निधीचा वाटा उचलण्याबाबतचे हमीपत्र महाराष्ट्र सरकारने द्यावे, यासाठी पत्रव्यवहार केला आहे. केंद्र सरकार २० टक्के, राज्य सरकार २० टक्के व उर्वरीत ६० टक्के रक्कम बाजारातून गुंतवणूक स्वरूपात व वित्तीय संस्थांकडून कर्ज स्वरूपात घेऊन १६०३९ कोटींचा प्रकल्प उभा करण्याचे रेल्वे बोर्डाचे धोरण आहे. 

भूसंपादनापोटी शेतकरी बांधवांना योग्य व चांगला मोबदला मिळवून देण्यासाठी मी स्वतः प्रयत्नशील आहे. त्यामुळे भूसंपादनासाठी नागरिकांनी शासनाला सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले. या रेल्वे प्रकल्पाला मंजुरी मिळाल्यानंतर पायाभूत सर्व्हे, ड्रोन सर्व्हे व इतर सर्व अडथळे पार करण्यासाठी मी नेहमीच जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून आग्रही भूमिका घेतली आहे. पुणे-नाशिक रेल्वे हे मी व शिरूर लोकसभेतील नागरिकांनी पाहिलेलं स्वप्न लवकरच प्रत्यक्षात उतरून ही रेल्वे या भागातील शेतकरी, व्यापारी, उद्योजक आदी सर्व क्षेत्रातील नागरिकांसाठी विकासाचा राजमार्ग ठरेल असा विश्वास आढळराव  पाटील यांनी व्यक्त केला.

आढळराव म्हणाले, ''गेल्या १५ वर्षांपासून मी पुणे-नाशिक रेल्वे मंजुरीसाठी पाठपुरावा करीत आहे. या प्रयत्नांचे फलित म्हणून सन २०१६ मध्ये तत्कालीन केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी लोकसभेत रेल्वे अर्थसंकल्प मांडताना या प्रकल्पाला मंजुरी दिली. त्यानंतर राज्य व केंद्र सरकारने महाराष्ट्र राज्यातील १३ रेल्वे प्रकल्पांसाठी संयुक्त भागीदारीतून महारेल ही कंपनी स्थापन केली. त्याद्वारे राज्यातील पहिल्या ३ प्राधान्याने हाती घेण्याच्या प्रकल्पांमध्ये पुणे-नाशिक रेल्वेचा समावेश होऊन ब्रिटिश काळापासून अस्तित्वात असलेल्या 'पिंकबुक' मध्येही या प्रकल्पाला अग्रभागी स्थान मिळवून देण्यात मला यश आले. तेव्हापासून या प्रकल्पाचे काम जलदगतीने सुरु आहे. या प्रकल्पाचा महत्वाचा भाग असलेल्या भूसंपादन प्रक्रियेस आता प्राथमिक स्तरावर सुरुवात झाली असून रेल्वे व राज्याच्या दृष्टीने हा प्रकल्प अतिशय महत्वाचा आहे.''  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख