कोयना धरणग्रस्त उतरले अंगणात, बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू

आजपासून हा लढा सुरू झाला आहे. हे आंदोलन कोयना धरणग्रस्त असलेल्या सातारासह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात शेकडो गावात सुरू आहे.
 koyana project affected people starts agitation for demands
koyana project affected people starts agitation for demands

पुणे : कोयना धरणाची निर्मिती होताना शेकडो लोकांना घर, गाव, जमिनी सोडून विस्थापित व्हायला लागलं. या धरणास 60 वर्ष पूर्ण झाली पण त्यांचे
अद्यापही पुनर्वसन न झाल्याने आजही हजारो लोक न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत. त्यांच्या तिसऱ्या पिढीनेही आता शासनाकडे न्याय मागण्यासाठी एल्गार पुकारला असून लॉकडाऊन व संचारबंदीमुळे गाव, वाड्यावस्त्या राहणाऱ्या धरणग्रस्तांनी घराच्या अंगणात आपल्या कुटुंबासह बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.  

६० वर्षाच्या प्रदीर्घ काळानंतर कोयना प्रकल्पग्रस्तांपैकी हजारो प्रकल्पग्रस्तांचा आणि त्यांच्यामधूनच निर्माण झालेल्या अभयारण्यग्रस्तांचे पुनर्वसन प्रलंबित आहे. गेल्या 3 वर्षामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रालयातील बैठकीत सकारात्मक निर्णय होऊनही प्रत्यक्षात अंमलबजावणी झाली नाही. या प्रकल्पग्रस्तांची एकही मूलभूत समस्या मार्गी लागलेली नाही. त्यामुळे या प्रकल्पग्रस्तांनी कायद्याच्या चौकटीत आणि शांततामय मार्गाने लढा करण्याचा घेतला आहे.

आजपासून हा लढा सुरू झाला आहे. हे आंदोलन कोयना धरणग्रस्त असलेल्या सातारासह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात शेकडो गावात सुरू आहे. या आंदोलनात श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ भारत पाटणकर, हरिश्चंद्र दळवी, मालोजी पाटणकर, महेश शेलार, सचिन कदम, चैतन्य दळवी, सीताराम पवार, रामचंद्र कदम, अर्जुन सपकाळ, परशुराम शिर्के यांच्यासह हजारो धरणग्रस्त आबालवृद्धबरोबर सकाळपासून ठिय्या मांडून बसले होते. या वेळी' जमीन नाही, पाणी नाही, त्यामुळे मजुरी नाही', 'जमीन द्या जमिनीला पाणी द्या, तोपर्यंत निर्वाहभत्ता तरी द्या,' अशा घोषणा देण्यात आल्या.

याबाबत बोलताना श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ भारत पाटणकर म्हणाले, "महाराष्ट्र सरकारने धरणग्रस्तांच्या मागण्या संदर्भात तातडीने निर्देश होऊन लवकरात लवकर कारवाई करावी. कोयना धरणामुळे आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी झालेल्या मोठ्या अभयारण्यामुळे बाधित झालेल्या हजारो प्रकल्पग्रस्तांच्या अस्तित्वाचा प्रश्न या परिस्थितीत गुंतलेला आहे. सामाजिक कृतज्ञतेची जाणीव असलेल्या व्यक्तीला या परिस्थितीमुळे उद्विग्न झाल्यावाचून पर्याय राहू शकत नाही." 

अपॉईंटमेंट घेऊनच काँग्रेस कार्यालयात प्रवेश : बाळासाहेब थोरात 
मुंबई :  महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे दादर येथील टिळक भवन हे कार्यालय आजपासून पुन्हा सुरु करण्यात आले असून शासनाच्या नियमानुसार १० टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती कार्यालयात असेल. या सर्व कर्मचाऱ्यांना योग्य ती काळजी घेण्याच्या तसेच अभ्यंगतांना अपॉईंटमेंट घेऊनच प्रवेश देण्याच्या सुचनाही देण्यात आल्या आहेत, अशी माहिती प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com