किरीट सोमय्या यांनी जुनी थडगी उकरायचे बंद करावे : राऊतांचा टोला  - Kirit Somaiya should stop digging old tombs Sanjay Raut | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

किरीट सोमय्या यांनी जुनी थडगी उकरायचे बंद करावे : राऊतांचा टोला 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 14 नोव्हेंबर 2020

जुनी थडगी उकरायचे किरीट सोमय्या यांनी बंद करावेत," असे खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. 

मुंबई : "गेल्या वर्षी दिवाळीत राज्यात सत्तांतर झाले होते, मागील वर्षी अनेक अघोरी प्रयोग विरोधकांनी केले. परंतू आम्ही त्याला पुरून उरलो. जुनी थडगी उकरायचे किरीट सोमय्या यांनी बंद करावेत," असे खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. 

संजय राऊत म्हणाले, "विरोधकांनी राज्यात 'आँपरेश लोटस' सारखी अनेक आँपरेशन केली पण कुठेच खरचटल नाही. या राज्यात आता कोणतीच ऑपरेशन होणार नाही
. महाविकास आघाडीने राज्यात एक वर्षाचा काळ यशस्वीपणे पूर्ण केला आहे. सरकार पाच वर्ष पूर्ण करेल."

"भाजपचे नेते किरीट सोमय्या यांची दखल त्यांचा पक्षही घेत नाही. सोमय्याविषयी आम्ही बोलावं. असं काही महान कार्य किरीट सोमय्या यांनी केलेलं नाही. त्यांचा पक्ष देखील त्यांच्याकडे गंभीरपणे पाहत नाही. जुनी थडगी उकरायची किरीट सोमय्या यांनी बंद करावेत
. आम्ही जर हे काम केलं तर सगळे सांगाडे त्यांचे सापडतील," असे राऊत यांनी सांगितले.

रऊत म्हणाले, "प्रत्येक वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी जवानांसोबत दिवाळी साजरी करतात हे चांगलं आहे. पण काल दोन जवान शहीद झाले हेही लक्षात घ्यायला हवं. तेजस्वी यादव यांनी ज्याप्रकारे बिहारची भूमिका जिंकली आहे. तेच खरे योद्धे आहेत."

अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांची मते काय माहिती नाही पण हिंदुस्थान मधील नेत्यांबाबत अस बोलणं चुकीचं आहे त्यांना अधिकार दिला कोणी ? ओबामांनी एक वक्तव्य करायचं आणि त्याच राजकारण इथल्या नेत्यांनी केलं ते चुकीचे आहे. राहुल गांधी खूप चांगलं काम करीत आहेत. नरेंद्र मोदींबाबत ते जर हे बोलले तरिही माझी भूमिका हीच असेल, असे राऊत यांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा : "अजित पवारांना भाजपच्या गोटात पाठवणे, हा तुमचाच प्लॅन होता का.. ?

मुंबई : "अजित पवार यांना भाजपच्या गोटात पाठवणे, हा तुमचाच प्लॅन होता का, अशी विचारणा स्टैंडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने खाकेली. ही शक्यता संजय राऊत यांनी पूर्णपणे नाकारली नाही. या प्रश्नावर राऊत यांनी सूचक मौन बाळगले. "अजित पवार यांना आम्हीच पाठवले, हे मीच कसे बोलू शकतो. सत्य आम्हाला माहिती आहे, तुम्हाला काय अंदाज बांधायचेत ते बांधा," अशी मोघम टिप्पणी संजय राऊत यांनी केली.शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांची स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा (kunal kamra) याने घेतलेली मुलाखत सध्या चर्चेचा विषय आहे.कामरा राऊतांना विचारतो, "तुम्ही अजित पवार यांना पुन्हा एकदा अशाच शपथविधीसाठी राजभवनात पाठवणार का," असा प्रश्न विचारला. तेव्हा राऊत यांनी म्हटले की, आता राजभवनातील अलार्म आणि घड्याळ बदलण्यात आले आहे. त्या प्रकारानंतर राजभवनात पहाटेचा अलार्म लावणे बंद झाले, अशी खोचक टिप्पणी संजय राऊत यांनी केली.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख