Khadse gave support from home as his leg was fractured ...  | Sarkarnama

पाय फॅक्चर असल्याने 'या' नेत्याने घरूनच दिला पाठिंबा...

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

मुक्ताईनगर येथेही आज महामार्गावर भाजपतर्फे आंदोलन करण्यात आले. राज्य सरकारच्या विरोधात घोषणा देत कार्यकर्त्यांनी महामार्ग क्रमांक सहा वर रास्ता रोको केले.

जळगाव : राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते एकनाथराव खडसे यांचा पाय फॅक्चर असल्याने घरूनच राज्यातील दूध खरेदीच्या दरवाढीसाठी आंदोलनाला पाठींबा जाहिर केला. मुक्ताईनगर येथे खासदार रक्षा खडसे यांच्या नेतृत्वात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. मध्यंतरी खडसे हे पक्षाच्या नेतृत्वावर नाराज असल्याची चर्चा होती. मात्र, आज त्यांनी आंदोलनांला पाठींबा दिला आहे. त्यामुळे पक्षावरच त्यांची नाराजी काही अशी दूर झाल्याचीही चर्चा आहे. 

राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या दूधाला भाव द्यावा, या मागणीसाठी भाजपतर्फे राज्यभर आज आंदोलन करण्यात आले. मुक्ताईनगर येथेही आज महामार्गावर भाजपतर्फे आंदोलन करण्यात आले. राज्य सरकारच्या विरोधात घोषणा देत कार्यकर्त्यांनी महामार्ग क्रमांक सहा वर रास्ता रोको केले.

शेतकऱ्यांच्या दूधाला भाव मिळालाच पाहिजे, मका खरेदी सुरू झालीच पाहिजे, अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी सरकारचा निषेध केला. खासदार रक्षा खडसे, जिल्हा बँक अध्यक्षा अॅड. रोहिणी खडसे, बेटी बचाओ, बेटी पढाओ संयोजक डॉ. राजेंद्र फडके यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. 

या आंदोलनामुळे काही वेळ महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. यावेळी रक्षा खडसे यांनी बोलतांना सांगितले, जर सरकारने शेतकऱ्यांच्या दूध खरेदीला भाव दिला नाही, तर राज्य सरकारच्या विरोधात आणखी तीव्र आंदोलन करण्यात येईल. हे सरकार शेतकरी विरोधी असल्याचा आरोपही त्यांनी केला. महाराष्ट्र उद्धव ठाकरे 

यावेळी त्यांनी तहसीलदारांना मागण्यांचे निवेदनही दिले. माजी मंत्री व भाजप नेते एकनाथराव खडसे यांनीही आंदोलनाला घरूनच पाठींबा दिला. त्यांच्या पायाला दुखापत झाली आहे. त्याला प्लॅस्टर करण्यात आल्याने ते घरीच आहेत. मात्र, आपला या आंदोलनाला पाठींबा आहे. शेतकऱ्यांच्या दूध खरेदीला भाव सरकारने दिलाच पाहिजे, असे मतही त्यांनी व्यक्त केले. 

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली पुण्यातही आंदोलन करण्यात आल. यावेळी माजी मंञी बाळा भेगडे, योगेश गोगावले आणि कार्यकर्ते उपस्थित होते. राज्यात सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडत आहे. शेतीमधील उद्धव ठाकरे यांना समजत नसलं तरी अजित पवार यांना समजते. त्यांनी तरी लक्ष घालावे, आज गावोगावी आंदोलन झालं आहे.

आमचं आंदोलन हिंसक नसेल असं आम्ही शेतकऱ्यांना सांगितलं. जर सरकारला जाग आली नाही तर आम्ही मोठं आंदोलन करू, असा इशारा चंद्रकात पाटील यांनी यावेळी सरकारला दिला आहे. सरकार संवेदनशील नाही हे दिसत सरकार ने खत बियाणे याची कृत्रिम टंचाई निर्माण झाली आहे, याचा अर्थ सरकारला हप्ता जातोय का काय अशी चर्चा सध्या सुरू आहे. अजित दादा तुम्हाला शेतातील सगळं समजत मग तुम्ही गप्प का ? असा सवाल पाटील यांनी केला आहे. 
 Edited  by : Mangesh Mahale 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख