मराठा आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्यांच्या वारसाला नोकरी 

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी करण्यात आलेल्या आंदोलनात बलिदान देणाऱ्या ४२ जणांच्या कुटुंबातील वारसांना दहा लाख रुपये आणि एसटी महामंडळात नोकरी देण्याच्या निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी करण्यात यावी, असा आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत संबंधित यंत्रणांना दिले आहेत.
Jobs to the legacy of those who sacrificed for Maratha reservation
Jobs to the legacy of those who sacrificed for Maratha reservation

मुंबई : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी करण्यात आलेल्या आंदोलनात बलिदान देणाऱ्या ४२ जणांच्या कुटुंबातील वारसांना दहा लाख रुपये आणि एसटी महामंडळात नोकरी देण्याच्या निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी करण्यात यावी, असा आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत संबंधित यंत्रणांना दिले आहेत. याबाबतचा निर्णय मागील भारतीय जतना पक्ष -शिवसेना युतीच्या सरकारने घेतला होता. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी (ता. १२ ऑगस्ट) मंत्रिमंडळ बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा होऊन काही विभागाचे निर्णय घेण्यात आले. या वेळी मराठा आरक्षण चळवळीविषयी मंत्रिमंडळाने चर्चा केली. या चर्चेमध्ये मराठा आरक्षण चळवळीत बलिदान दिलेल्या ४२ जणांच्या कुटुंबातील वारसांच्या मदतीबाबत आढावा घेण्यात आला. 

याच बैठकीत आरक्षणाच्या चळवळीदरम्यान अनेक आंदोलकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. हे गुन्हे मागे घेण्याबाबत देखील चर्चा झाली. या चर्चेनुसार आंदोलकांवरील सरसकट गुन्हे मागे लवकरच घेण्यात येणार असल्याचे समजते. मराठा आरक्षणाबाबतचा प्रश्‍न सध्या चर्चिला जात आहे. भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात या ४२ आंदोलकांच्या वारसांपैकी एकास एसटी महामंडळात नोकरी तसेच दहा लाख रुपये आर्थिक भरपाई देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयाच्या अंमलबजावणीचा आढावा मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री ठाकरे यांनी घेऊन प्रशासकीय यंत्रणेना आदेश देण्यात आले. 

मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या ४२ जणांच्या कुटुंबातील वारसांना दहा लाख रुपये व एसटी महामंडळात नोकरी देण्याचा निर्णय मागील सरकारने घेतला होता. याची ताबडतोब अंमलबजावणी व्हावी, यासाठी बलिदान दिलेल्या व्यक्तींचे कुटुंबीय मागणी करत होते. ही बाब ध्यानात घेऊन मुख्यमंत्र्यांनी तत्काळ अंमलबजावणीचे आदेश दिले आहेत. 
- एकनाथ शिंदे, नगरविकास मंत्री

Edited by Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com