मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेनंतर जयंत पाटील राज्याच्या दौऱ्यावर

जयंत पाटील यांनी एका मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री पदाची इच्छा व्यक्त केली होती. पाटील यांनी केलेल्या विधानाची राज्यात चांगलीच चर्चा रंगली होती. त्यांच्या या इच्छेला उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे यांनीही पाठिंबा दिला.
Jayant Patil on a state tour after discussions on the Chief Ministers post
Jayant Patil on a state tour after discussions on the Chief Ministers post

मुंबई : मुख्यमंत्री व्हावं असं वाटत असल्याची इच्छा व्यक्त करणारे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील आता थेट राज्याच्या दौऱ्यावर निघाले आहेत. सलग 18 दिवस ते 14 जिल्हे पिंजून काढणार असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

जयंत पाटील यांनी एका मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री पदाची इच्छा व्यक्त केली होती. पाटील यांनी केलेल्या विधानाची राज्यात चांगलीच चर्चा रंगली होती. त्यांच्या या इच्छेला उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे यांनीही पाठिंबा दिला. तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही त्यांच्या या इच्छेचा अनादर केला नाही. त्यानंतर काही दिवसांतच पाटील यांनी राज्याच्या दौऱ्याची आखणी केली आहे. 

'राष्ट्रवादी परिवार संवाद दौरा' असे त्याला नाव देण्यात आले आहे. पाटील यांनी या दौर्‍याची आज पत्रकार परिषदेत घोषणा केली. पाटील यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत इच्छा व्यक्त केल्यानंतर राज्यभर मोठी चर्चा झाली होती. आता ते राज्याच्या दौऱ्यावर निघाल्याने या चर्चेने पुन्हा जोर घेतला आहे. 
या दौऱ्यामध्ये इतर पक्षांतील काही नाराज नेते व पदाधिकाऱ्यांचाही राष्ट्रवादीमध्ये प्रवेश होऊ शकतो.

प्रामुख्याने निवडणुकीपुर्वी भाजपमध्ये गेलेले काही नेते घरवापसी करण्याची शक्यता आहे.राष्ट्रवादीकडूनही त्यादृष्टीने जोरदार प्रयत्न केले जाऊ शकतात. पुढील वर्षभरात काही महापालिकांच्या निवडणुका आहेत. या निवडणुकांना डोळ्यासमोर ठेऊन राष्ट्रवादीकडून तयारी सुरू करण्यात आल्याचे बोलले जात आहे.  

दरम्यान, राष्ट्रवादीकडून गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, वाशिम, नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, बुलढाणा, जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांचा दौरा केला जाणार आहे. या दौर्‍याचा हा पहिला टप्पा असून दुसऱ्या टप्प्यात उर्वरित महाराष्ट्रातील जिल्हे असतील. 

या दौऱ्यात पक्षाचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल पटेल, गृहमंत्री अनिल देशमुख, अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, यांच्यासह राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे रविकांत वर्पे, सुरज चव्हाण, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर तसेच राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे उपस्थित राहतील, असेही जयंत पाटील यांनी सांगितले.

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com