जयंत पाटीलही मंगळवेढ्यात पावसात भिजले : भगीरथ भालकेंना फायदा होणार का?

पोटनिवडणुकीचा प्रचार रंगात
jayant patil wets in rain
jayant patil wets in rain

मंगळेवढा : पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात पोटनिवडणुकीनिमित्ताने भगीरथ  भालके यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सभा घेतली. मंगळवेढा तालुक्यातील सलगर बु. येथे झालेल्या सभेत जोरदार पाऊस झाला. या पावसातही पाटील यांनी आपले भाषण जोरदार पद्धतीने केले. जयंत पाटील यांनी पावसात भिजत भाषण पूर्ण केले. नेतेमंडळी पावसात भिजले की उमेदवार निवडून येतो, असे समीकरण आहे. त्यामुळे जयंत पाटील भिजल्याचा फायदा भालके यांना होणार का, याची उत्सुकता आहे.

राज्यात 2019 मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी साताऱ्यात शरद पवार यांच्या झालेल्या सभेत पाऊस पडला. या भर पावसात पवार यांनी केलेले भाषण राज्यात गाजले. त्यामुळे छत्रपती उदयनराजे यांच्यासारख्या दिग्गज उमेदवाराचा पराभव झाला. त्याची आठवण या निमित्ताने सभेत निघाली.  

आपल्या दहा मिनिटांच्या भाषणात पाटील यांनी टोलेबाजी केली. खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्यावरही टीका केली. ते म्हणाले की मंगळवेढ्याला जास्तीतजास्त पाणी मिळावे यासाठी भारत नाना २००९ पासून पाठपुरावा करत होते. भाजप सरकारच्या काळात या मतदारसंघाचे पाणी गायब केले गेले. आपले सरकार आले तेव्हा मंत्री केलं नाही तरी चालेल पण माझ्या मतदारसंघाला पाणी द्या अशी भूमिका भारत नानांनी घेतली होती. योगायोगाने मी जलसंपदा मंत्री झालो आणि आचारसंहिता लागण्याआधीच आपल्या तालुक्याला दोन टीएमसी पाणी देण्याचा निर्णय घेतला. इथल्या खासदारांनी गाव दत्तक घेतलं असं कळलं पण कधी इथे फिरकले नाही. भगीरथ भालके यांच्या नेतृत्वात पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यातील २४ गावांना सुजलाम सुफलाम करण्याचा आमचा मानस आहे. 

सत्ता गेल्यामुळे भाजपच्या लोकांना वेड लागलं आहे. पाण्याविना मासा तडफडतो तशी भाजपची परिस्थिती झाली आहे. या लोकांकडे दुर्लक्ष करून भगीरथ भालके यांना विजयी करा. भारत नानांचा हा मुलगा,  पवार साहेबांच्या आशीर्वादाने या मतदारसंघासाठी आधुनिक भगीरथ ठरेल, असा विश्वास त्यांनी केला. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काॅंग्रेसचेे महाविकास आघाडीचे सरकार स्थिर असल्याचा दावा त्यांनी यानिमित्ताने केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com