अन्वय नाईक, ठाकरे यांच्या एकत्रित जमिन खरेदीची चौकशी करा  : सोमय्या  - Inquire into  Anvay Naik Rashmi Thackeray joint land purchase  Kirit Somaiya | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शरद पवार, देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे, उद्धव ठाकरे आज एकाच व्यासपीठावर

अन्वय नाईक, ठाकरे यांच्या एकत्रित जमिन खरेदीची चौकशी करा  : सोमय्या 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 11 नोव्हेंबर 2020

अन्वय नाईक आणि त्यांचे कुटुंबीय अक्षता, आज्ञा आणि रश्मी ठाकरे, मनिषा वायकर यांनी रायगड जिल्ह्यातील मुरूड तालुक्यात एकत्रित व्यवहार केल्याचे उघड झाले आहे. हे व्यवहार प्रथमदर्शनी संशयास्पद वाटत आहे, त्याची चौकशी करावी," अशी मागणी किरीट सौमय्या यांनी रायगड जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

मुंबई : "अन्वय नाईक कुटुंबिय आणि रश्मी ठाकरे यांच्या एकत्रित जमिनी खरेदीत चौकशी करा," अशी मागणी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.

"पत्रकार अर्णब गोस्वामी यांनी पैसे थकवल्यामुळे आत्महत्या केलेले अन्वय नाईक आणि त्यांचे कुटुंबीय अक्षता, आज्ञा आणि रश्मी ठाकरे, मनिषा वायकर यांनी रायगड जिल्ह्यातील मुरूड तालुक्यात एकत्रित व्यवहार केल्याचे उघड झाले आहे. हे व्यवहार प्रथमदर्शनी संशयास्पद वाटत आहे, त्याची चौकशी करावी," अशी मागणी किरीट सौमय्या यांनी रायगड जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक व त्यांची आई कुमुद नाईक यांच्या २०१८ मध्ये झालेल्या मृत्युप्रकरणी रिपब्लिक टिव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना बुधवारी (ता.4) महाराष्ट्र पोलिसांनी अटक केली होती. इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक व त्यांच्या मातोश्री कुमुद नाईक हे दोघे २०१८ मध्ये अलिबाग येथे मृतावस्थेत सापडले होते. या दोघांनीही आत्महत्या केली होती. 

पोलिसांना त्यावेळी अन्वय यांनी लिहिलेली चिठ्ठी सापडली होती. अर्णब गोस्वामी व अन्य दोघांनी आपणास व्यवहाराचे ५ कोटी ४० लाख रुपये न दिल्याने आपण आर्थिक अडचणीत आलो असून, त्यामुळे आत्महत्या करावी लागत असल्याचे या चिठ्ठीत म्हटले होते. त्यावेळी पोलिसांनी अर्णब यांच्या विरोधात अन्वय व त्यांच्या आईला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवला होता. ही फाईल नंतर बंद करण्यात आली. आता पुन्हा या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. 

हेही वाचा : सर्वोच्च न्यायालय म्हणाले, गोस्वामींचे चॅनेल पाहत नाही पण...

मुंबई : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेच्या मुद्द्यावरुन मोठा गदारोळ सुरू आहे. गोस्वामी यांची 14 दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे. गोस्वामी हे सध्या तळोजा तुरुंगात आहेत. गोस्वामी यांचा जामीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळला होता. त्यावर गोस्वामी यांनी थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. यावरील सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाने काही प्रश्न आज उपस्थित केले.   

गोस्वामी यांना वरळीतील निवासस्थानातून 4 नोव्हेंबरला अटक करुन अलिबाग जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने गोस्वामी यांची रवानगी 14 दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत केली होती. न्यायालयीन कोठडीमुळे गोस्वामी यांना सध्या त्यांना तळोजा कारागृहात ठेवण्यात आले आहे. 

गोस्वामी यांनी अटकेला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. उच्च न्यायालयाने 9 नोव्हेंबरला गोस्वामी यांच्या जामीन अर्जावर निर्णय दिला. उच्च न्यायालयाने गोस्वामी यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. दरम्यान, गोस्वामी यांनी अलिबाग सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला आहे. यावर अलिबाग न्यायालयाला चार दिवसांत निर्णय देण्याचेही उच्च न्यायालयाने निर्देश दिले होते. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख