शिक्षक अन् कर्मचाऱ्यांसाठी शिक्षणमंत्री गायकवाड यांचा महत्वपूर्ण निर्णय.. - Important decision of Education Minister Gaikwad for teachers and staff  | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पूरग्रस्तांना तातडीची मदत; घरात पाणी शिरलेल्यांना १० हजार, अन्न धान्याचे नुकसान झालेल्यांना ५ हजार रुपय मिळणार. वडेट्टीवार यांची घोषणा
सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदार व खासदारांचे एक महिन्याचे वेतन पुरग्रस्तांना देण्यात येणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगलीत दिली.

शिक्षक अन् कर्मचाऱ्यांसाठी शिक्षणमंत्री गायकवाड यांचा महत्वपूर्ण निर्णय..

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 12 नोव्हेंबर 2020

शाळांना दिवाळीच्या सुट्या 20 नोव्हेंबर आहेत. त्यानंतर इयत्ता 9 वी ते 12 वी पर्यंतचे वर्ग सुरू होणार आहेत. या पार्श्वभूमीवर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी टि्वट केलं आहे.

मुंबई :लॅाकडाउननंतर मिशन बिगीन अगेनच्या माध्यमातून राज्य सरकार टप्प्याटप्प्याने जनजीवन पूर्ववत करण्याचा प्रयत्न करीत आहेत. धार्मिक स्थळे, मंदिरे, प्रार्थना स्थळे यांबाबत दिवाळीनंतर निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी राज्यातील जनतेशी आँनलाईन संवादात सांगितले होते.  

शाळांना दिवाळीच्या सुट्या 20 नोव्हेंबर आहेत. त्यानंतर इयत्ता 9 वी ते 12 वी पर्यंतचे वर्ग सुरू होणार आहेत. या पार्श्वभूमीवर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी टि्वट केलं आहे. राज्य सरकारकडून मुंबई व उपनगरातील शालेय शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना मुंबई लोकलने प्रवास करण्याची परवानगी देण्यात आल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विटच्या माध्यमातून दिली आहे. 

"राज्य सरकारच्या वतीनं मुंबई व उपनगरांत शाळेत शिकवणाऱ्या शिक्षक, शिक्षिका तसेच अन्य कर्मचाऱ्यांना मुंबई उपनगरीय लोकल ट्रेनने प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. यासंदर्भातील निवेदन पत्र मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आले आहे," असे टि्वट वर्षा गायकवाड यांनी केलं आहे. 

हेही वाचा : खासदार गोपाळ शेट्टींमुळे उजळली दिव्यांगाना दिवाळी.... 

मुंबई : दिवाळीनिमित्त विविध लोकप्रतिनिधी फराळवाटप, उटणेवाटप, दिवाळी पहाट असे कार्यक्रम करीत असताना उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी मात्र अकराशे अंध-अपंगांच्या जीवनात प्रकाश आणण्यासाठी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयाच्या साह्याने तब्बल सव्वा कोटी रुपयांची उपकरणे दिली. उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील दहिसर, बोरिवली, चारकोप, मागाठाणे, कांदिवली येथे या उपकरणांचे वाटप करण्यात आले. भविष्यात एकाही दिव्यांग व्यक्तीला आवश्यक अशा उपकरणांची कमतरता भासता कामा नये यादृष्टीने आपले प्रयत्न सुरु आहेत. यापुढेही कोणाही दिव्यांग व्यक्तीला उपकरणांची आवश्यक्ता असली तर त्यांनी आपल्याशी संपर्क साधावा, असेही शेट्टी यांनी यावेळी सांगितले.यावर्षीच्या जानेवारी महिन्यातच शेट्टी यांनी उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील दिव्यांग व्यक्तींची हे साह्य मिळण्यासाठी नावनोंदणी केली होती. त्यांना लागणाऱ्या उपकरणांची मागणीही त्यांच्याकडून नोंदवून त्याचे अर्जही केले होते. नंतर त्यांनी केंद्रीय सामाजिक न्याय खात्याचे मंत्री थावरचंद गेहलोत यांच्याशी पत्रव्यवहार करून ती उपकरणेही मिळवून दिली. त्या उपकरणांचे वाटप नुकतेच करण्यात आले, यावेळी गेहलोत देखील वेबिनारच्या माध्यमातून हजर होते.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख