सगळी मदत केंद्राकडूनच हवी असेल, तर राज्यातील सत्ताही भाजपकडे द्या..

राज्यात तीन वर्षांच्या मुलीपासून वयोवृद्ध महिला सुरक्षित नाहीत. गृहमंत्री राज्यात कायदा सुव्यवस्था आहे असे म्हणत असले तरी मला राज्यात कायदा सुव्यवस्था दिसत नाही.राज्य सरकारने भाजपच्या पायाभूत योजनांना वर्षभर स्थगिती देण्याचे काम केले आहे. त्यामुळे हे स्थगितीचे सरकार आहे. स्वतःचे अपयश लपविण्यासाठी राज्य सरकार केंद्राने मदत करावी अशी मागणी करत राहते.
Mp Pritam Munde press conference news jalna
Mp Pritam Munde press conference news jalna

जालना : महाविकास आघाडी सरकारची वर्षपूर्ती ही जनतेची निराशापुर्ती आहे. राज्य सरकारला सर्व मदत केंद्राकडून हवी असेल तर केंद्र सरकारच्या पक्षाकडे म्हणजे भाजपकडे राज्यातील सत्ता द्या, असा टोला भाजप प्रदेश उपाध्यक्ष खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी लगावला. राज्यात लवकरच भाजपचे सरकार येईल, असा दावाही त्यांनी केला.

जालना येथे राज्य सरकारच्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने त्यांच्याअपयशाचा पाढा वाचण्यासाठी भाजपच्या वतीने आज (ता.३०) पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खासदार मुंडे यांनी राज्य सरकारवर टिका करतांनाच वर्षभरातील कामकाजावर चिमटेही काढले. यावेळी  भाजप जिल्हाध्यक्ष आमदार संतोष दानवे, आमदार नारायण कुचे, जिल्हा उपाध्यक्ष भास्कर दानवे, शहराध्यक्ष राजेश राऊत आदींची उपस्थिती होती.

डॉ. मुंडे म्हणाल्या, राज्य सरकार मागील वर्षभरात सर्व बाबतीत अपयशी ठरले आहे. अतिवृष्टीतुन  शेतकऱ्यांना दिलासा देण्यात हे सरकार अपयशी ठरले आहे. सत्तेत येण्यापूर्वी हेक्टरी ५० हजारांच्या मदतीची मागणी करणारे सत्तेत आल्यानंतर हेक्टरी दहा हजाराची मदत करत आहेत.  ही मदत देखील अनेक शेतकऱ्यांना मिळाली नाही. कोरोना महामारी हाताळण्यात सरकार सपशेल अपयशी ठरले आहे.  केंद्र सरकारने कोव्हिडच्या काळात  प्रत्येक जिल्ह्याला १८ ते २० लाखांचा निधी दिली. कंत्राटी आरोग्य कर्मचारी भरण्यासाठी देखील केंद्राने निधी दिला.

पीएम फंडातून व्हिटीलेंटर दिली, प्रत्येक बीपीएल धारकांना केंद्र सरकारने मोफत धान्य दिले. मात्र, राज्य शासनाने या काळात सामान्य माणसाला काहीच दिले नाही. उलट मोठ्या शहरांमध्ये कोव्हिड सेंटर उभारण्यास विलंब झाल्याने याचा फटका देखील सर्वसामान्यांना बसल्याचे प्रीतम मुंडे म्हणाल्या. पुणे येथे उभारण्यात आलेल्या कोव्हिड सेंटरमध्ये भ्रष्ट्राचार झाल्याचा आरोप करत. या ठिकाणी महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्याचेही प्रीतम मुंडे यांनी सागंतिले.

आज राज्यात तीन वर्षांच्या मुलीपासून वयोवृद्ध महिला सुरक्षित नाहीत. गृहमंत्री राज्यात कायदा सुव्यवस्था आहे असे म्हणत असले तरी मला राज्यात कायदा सुव्यवस्था दिसत नाही. राज्य सरकारने भाजपच्या पायाभूत योजनांना वर्षभर स्थगिती  देण्याचे काम केले आहे. त्यामुळे हे स्थगितीचे सरकार आहे. स्वतःचे अपयश लपविण्यासाठी राज्य सरकार केंद्राने मदत करावी अशी मागणी करत राहते. जर सर्वच मदत केंद्र सरकारकडून हवी असेल तर केंद्र सरकारच्या पक्षाकडे म्हणजे भाजपकडे राज्यातील सरकार द्यावे, असा टोला लागावेत लवकरच राज्य भाजपची सत्ता येईल, असा दावा डॉ. मुंडे यांनी यावेळी  केला.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com