कोरोनाची दुसरी लाट आली तर त्याला भाजप जबाबदार असेल...

भाजपचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते रस्त्यावर उतरून गर्दी जमवत आहे. त्यामुळे निश्चितच कोरोनाचा धोका वाढू शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी ही बाब त्यांत्या कानावर घालत कोरोना काळात राजकीय आंदोलने व राजकारण करणाऱ्यांना समज द्यावी, अशी मागणी केली होती. त्यानंतर भाजपचे नेते शहाण्या सारखं वागतील अशी अपेक्षा आहे.
Minister Abdul Sattar Stament Media news nanded
Minister Abdul Sattar Stament Media news nanded

औरंगाबाद ः राज्यात कोरोनाची दुसरी लाट येऊ नये, जनता सुरक्षित राहावी यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे प्रयत्नशील आहेत. ही लाट रोखण्यासाठीचे सर्वोत्तपरी प्रयत्न ते या सरकारचे प्रमुख म्हणून करत आहेत. पण भाजपचे लोक या कोरोनाच्या संकटात देखील मंदिर, मशीद उघडण्यावरून राजकारण करत आहेत. रस्त्यावर गर्दी जमवून आंदोलन करत आहेेत. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो. मुख्यमंत्री महोदयांनी पंतप्रधानांच्या बैठकीत देखील हा मुद्दा उपस्थित केला होता. त्यामुळे भाजपने आता समजुतदारपणा दाखवायला हवा. अन्यथा राज्यात कोरोनाची दुसरी लाट आली तर त्याला सर्वस्वी भाजप जबाबादार असेल, अशी टिका शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना केली.

महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्या प्रचारार्थ नांदेड येथे आयोजित पदवीधर व कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला अब्दुल सत्तार यांनी हजेरी लावली. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या मेळाव्यानंतर प्रसारमाध्यमांनी सत्तार यांना राज्यात वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊन होणार का? असा प्रश्न विचारला. यावर उत्तर देतांना सत्तार म्हणाले, सध्या राज्यात लाॅकडाऊन करावा अशी परिस्थीती नाही. राज्य सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या संदर्भात आवश्यक ती काळजी घेत आहे. 

परंतु अशा संकटाच्या काळात देखील विरोधी पक्ष असलेल्या भाजपकडून राजकारण सुरू आहे. मंदिर उघडा, मशिदी उघडा अशी मागणी करत भाजपचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते रस्त्यावर उतरून गर्दी जमवत आहे. त्यामुळे निश्चितच कोरोनाचा धोका वाढू शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी ही बाब त्यांत्या कानावर घालत कोरोना काळात राजकीय आंदोलने व राजकारण करणाऱ्यांना समज द्यावी, अशी मागणी केली होती. त्यानंतर भाजपचे नेते शहाण्या सारखं वागतील अशी अपेक्षा आहे. पण जर तसे घडले नाही आणि राज्यात कोरोनाची दुसरी लाट आली तर त्याला भाजप हा पक्षच जबाबदार असेल, याचा पुनरुच्चार सत्तार यांनी केला.

सत्तार यांनी घातलेली टोपी आणि त्यांनी घेतलेली शपथ या संदर्भात प्रसार माध्यमांनी छेडले असता रावसाहेब दानवे यांचा पराभव करण्यासाठी मी ही टोपी घातली होती. पण तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवली. त्यामुळे दानवेंना निवडून आणावे लागले, आणि पाच वर्ष टोपीचा मुक्काम वाढला असे सत्तार यांनी सांगितले.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com