#मराठा आरक्षण : देवेंद्र फडणवीस यांचं नाव पाटील, जाधव असते तर : उदयनराजे.. - If Devendra Fadnavis's name is Patil, Jadhav  | Politics Marathi News - Sarkarnama

#मराठा आरक्षण : देवेंद्र फडणवीस यांचं नाव पाटील, जाधव असते तर : उदयनराजे..

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 19 सप्टेंबर 2020

जातीवरून राजकारण करणाऱ्यांना उदयनराजे यांनी चांगलचं सुनावलं आहे.   

मुंबई : मराठा आरक्षणाला न्यायालयानं स्थगिती दिल्यानंतर आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. न्यायालयात मराठा समाजाची बाजू मांडण्यास राज्य सरकार अपयशी ठरलं, असा आरोप करून आता मराठा आरक्षणाबाबत कोणी नेतृत्व करावं, अशी चर्चा राज्यात रंगली आहे. जातीवरून राजकारण करणाऱ्यांना उदयनराजे यांनी चांगलचं सुनावलं आहे.   

छत्रपती उदयनराजे भोसले यांनी वेळ आली तर मराठा आरक्षणासाठी खासदारकीचा राजीनामा देईन, असं काल स्पष्ट केलं होतं. मराठा समाजाला आणि राज्यातील सर्वांना समाजाच्या हितासाठी मी काय केलं आहे हे माहिती आहे. माझी जात ब्राह्मण असल्याने माझ्या माथी सर्व मारलं तर चालतं असं काही जणांना वाटतं. काही लोक तसा प्रयत्न करत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर एका प्रश्नाला उत्तर देताना उदयनराजे म्हणाले की देवेंद्र फडणवीस हे माझे मित्र आहेत. त्या प्रकरणात त्यांचं काय चुकलं. देवेंद्र यांचं नाव पाटील, जाधव असतं तर कुणी काहीचं बोललं नसतंय मराठा आरक्षण प्रकरणामध्ये ब्राम्हणचा संबधच काय आहे. आपण लोकशाहीमध्ये राहतो. तरी काही लोक जातीपातीवरून मतदान करतात, यामुळं अनेक चांगले लोकं यापासून अलिप्त राहतात. 

मराठा समाजाला आणि राज्यातील सर्वांना समाजाच्या हितासाठी मी काय केलं आहे हे माहिती आहे. माझी जात ब्राह्मण असल्याने माझ्या माथी सर्व मारलं तर चालतं असं काही जणांना वाटतं. काही लोक तसा प्रयत्न करत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलतांना ते म्हणाले, "ज्यावेळी तुम्ही नागरिकांना समजावू शकत नाही, तेव्हा त्यांना गोंधळात टाका असा एक सिद्धांत आहे. त्यामुळे काहीही करून हे मागील सरकारच्या माथी मारण्याचा प्रयत्न सुरू आहे. हे सांगण मला शोभत नाही, पण दुदैवाने सांगतो की काही जणांना वाटतं की मी ब्राह्मण असल्याने मराठा आरक्षण माझ्या माथी मारलं तर चालतं, यासाठी काहीजण प्रयत्न करीत आहेत. अशा प्रकारच्या चुकीच्या बातम्या पसविण्याचं काम करणारे यात यशस्वी होणार नाही, असे फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. 

देवेंद्र फडणवीस म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज हे आपलं आराध्यदैवत आहे. त्यांच्या वंशजांबद्दल आपल्या सगळ्याच्या मनात अपार श्रद्धा आहे. यांच्यात कोणी फूट पाडू नये. मराठा आरक्षणाबाबत कोणी नेतृत्व करावं, यासाठी छत्रपतींच्या घरात दोन भाग पडतील, अशी परिस्थिती निर्माण करू नये, दोघांनीही त्याचं नेतृत्व करणं गरजेचं आहे. वाद होणार नाही, तसा प्रयत्न करू नये, दोन्हीही समजूतदार आहेत. दोघांनीही नेतृत्व करावं. 

मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या खंडपीठासमोर आहे. यामुळे राज्य सरकारने पोलिस भरती करू नये, पोलिस भरती थांबविली नाही, तर मराठा समाजाचा आक्रोश रस्त्यावर दिसेल, असा इशारा खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी राज्य सरकारला दिला आहे. मराठा आरक्षण सध्या न्यायप्रविष्ठ असताना, राज्य सरकार पोलिस भरती का करीत आहे, असा प्रश्न संभाजी राजे यांनी उपस्थित केला आहे. याबाबत त्यांनी टि्वट केलं आहे. ते म्हणतात की सरकारनं मराठा समाजाला चिथावणी दिली आहे. सरकारचं टाइमिंग चुकलं आहे. मराठा आरक्षणाशिवाय ही पोलिस भरती करू नये. याबाबत मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणार आहे, असं टि्वट संभाजी राजेंनी केलं आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख