मी पुन्हा येईन म्हटंल की, हल्ली लोक हसतात ; जयंत पाटलांचा टोला..

काॅंग्रेस-राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेले लोक त्यांना कधी येणार असे वारंवार विचारत असतात, त्यामुळे ठरलेल्या तारखांना भाजपचे नेते सरकार पडणार असे सांगून त्यांना रोखून धरत आहेत असा टोला त्यांनी लगावला. खरं तर लोकांनी भाजपच्या नेत्यांना तुमचे सरकार कसे येणार, फोडाफोडी करून की आमदारांचे राजीनामे घेऊन त्यांना पुन्हा निवडूण आणणार का? हे विचारले पाहिजे, असेही पाटील म्हणाले.
Minsiter Jaynt Paitl Speech in latur news
Minsiter Jaynt Paitl Speech in latur news

औरंगाबाद ः `मी पुन्हा येईन`,असं म्हटलं की, हल्ली लोक हसतात, म्हणून अनेक जण दोन महिने- तीन महिन्यानंतर येईल असे म्हणू लागले आहे, असा टोला राज्याचे जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी फडणवीस यांना लगावला. लातूर येथे मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्या प्रचारार्थ आयोजित पदवीधर व कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.

मराठवाडा पदवीधर निवडणुकीच्या निमित्ताने मराठवाड्यात महाविकास आघाडीच्या नेते, मंत्र्यांचे ठिकठिकाणी मेळावे, बैैठका होत आहेत. लातूरच्या दयानंद सभागृहात आज जयंत पाटील यांच्या उपस्थितीत मेळावा पार पडला. यावेळी वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांची देखील प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना जयंत पाटील म्हणाले, राज्यातील महाविकास आघाडी अत्यंत भक्कमपणे काम करत आहे. आपलं सरकार सत्तेवर आलं आणि कोरोनाच्या जागतिक संकटामुळे आपली सात ते आठ महिने वाया गेली. राज्याच्या तिजोरीतील उत्पन्न अगदी तीन-चार-पाच हजार कोटींपर्यंत घटले. सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी बारा हजार कोटी रुपये लागतात. आता कुठे परिस्थिती हळुहळु सुधारते आहे.

अर्थमंत्री म्हणून अजित पवार यांनी जो अर्थसंकल्प विधानसभेत मांडला होता, त्याची अंमलबजावणी जर करता आली असती तर आज महाराष्ट्र अधिक वेगाने विकासाच्या बाबतीत पुढे गेला असता. पण कोरोना संकटामुळे ते होऊ शकले नाही. मात्र आता आपण विकासाच्या दिशेन वेगाने वाटचाल करणार आहोत.

विशेषतः मराठवाड्यातील लातूर, बीड आणि उस्मानाबाद या तीन जिल्ह्यातील पाण्याचा प्रश्न आपल्याला प्रामुख्याने सोडवायचा आहे. कृष्णा खोऱ्यातून अतिरिक्त पाणी या भागात आणायचे आहे. नगर -नाशिक भागात वळण बंधारे बांधून ते पाणी या तीन्ही जिल्ह्यातील प्रत्येक एकरातील झाडाच्या बुंध्यापर्यंत पोहचवण्याची याेजना तयार आहे.  गेल्या वर्षभरात या संदर्भात मी १० ते १२ बैठका घेतल्या आहेत. पण त्या संदर्भात आज अधिक काही सांगणार नाही, आचारसंहिता आहे. पुन्हा कधीतरी बोलवा तेव्हा सविस्तर सांगेन असेही जयंत पाटील म्हणाले.

राज्यातील महाविकास आघाडी सरकार दोन महिन्यात पडणार या भाजप नेत्यांच्या विधानाची जयंत पाटील यांनी पुन्हा खिल्ली उडाली. काॅंग्रेस-राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेले लोक त्यांना कधी येणार असे वारंवार विचारत असतात, त्यामुळे ठरलेल्या तारखांना भाजपचे नेते सरकार पडणार असे सांगून त्यांना रोखून धरत आहेत असा टोला त्यांनी लगावला. खरं तर लोकांनी भाजपच्या नेत्यांना तुमचे सरकार कसे येणार, फोडाफोडी करून की आमदारांचे राजीनामे घेऊन त्यांना पुन्हा निवडूण आणणार का? हे विचारले पाहिजे, असेही पाटील म्हणाले.

सतीश चव्हाण यांनी विधान परिषदेत एमपीएससीची परीक्षा देणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा वाढवून घेण्यासाठी, महापोर्टल बंद करण्यासाठी आवाज उठवला. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी महापोर्टल बंद करण्याचा निर्णय घेतला. यासह पदवीधर, शिक्षक आणि इतर प्रश्न त्यांनी सभागृहात मांडले आहे. त्यामुळे पुन्हा त्यांना विजयी करा, असे आवाहन देखील जयंत पाटील यांनी उपस्थितांना केले.

विलासराव बोलत असल्याचा भास झाला..

अमित देशमुख यांच्या भाषणाचा उल्लेख करत जयंत पाटील म्हणाले, डोळे बंद करून जर भाषण ऐकले तर विलासराव देशमुखच बोलत आहेत, असा मला भास झाला. त्यामुळे मला उशीर होत असला तरी मी तुम्हाला रोखले नाही आणि भाषण ऐकत राहिलो. ९९ ते २००८ दरम्यान विलासराव देशमुख यांच्या सोबत काम करण्याची संधी मला मिळाली. त्यांचे विचार, भाषणाची मांडणी हे नेहमीच मला आवडायचे अशी आठवण देखील जयंत पाटील यांनी यावेळी सांगितली.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com