अनिल देशमुखांनी लसीबाबत केले जनतेला हे आवाहन..

गृहमंत्री अनिल देशमुख यांना राज्यातील जनतेला कोरोना लसीबाबतखबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहे.
anil desmukh16 - Copy.jpg
anil desmukh16 - Copy.jpg

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोरोना लसीकरण मोहीमेला आज देशात सुरवात झाली आहे. राज्यात या लसीकरण मोहीमेचा प्रारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित मुंबईत बीकेसी सेंटर येथे झाला.  राज्यातील विविध केंद्रावर कोरोना लस दिली जात आहे. या लस नोंदणीसाठी फसवणूक होऊ शकते, त्यासाठी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना राज्यातील जनतेला खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहे. कुठल्याही भूलथापांना बळी न पडण्याचे आवाहन देशमुख यांनी जनतेला केले आहे. 

याबाबत अनिल देशमुख यांनी टि्वट करून जनतेला सावध राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. आपल्या टि्वटमध्ये अनिल देशमुख म्हणतात, ''राज्यात कोरोना लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे. ही मोहीम केंद्रीय यंत्रणेकडून जिल्हा यंत्रणेमार्फत राबविली जात आहे. काही सायबर हल्लेखोर नागरिकांना फोन करून या लसीची नोंदणी करण्यासाठी मोबाईलवर आलेला ओटीपी, आधार क्रमांक, पिन कोड व इतर वैयक्तिक माहिती विचारत आहेत.'' 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की आज आपण एक आपण एक क्रांतीकारक पाऊल टाकत आहोत. कोरोना संकटाच्या काळात रूग्णालये पुरत नव्हती. यावेळी आरोग्यकर्मचाऱ्यांनी साथ दिली. कोरोना लस घेतल्यानंतर काळजी घेणं महत्वाचे आहे. तोंडावरचा मास्क ही सर्वात चांगली लस आहे.  

जगातील सर्वात मोठ्या कोरोना लसीकरणास आज देशात सुरवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मोहिमेचे उद्घाटन झाले. यावेळी मोदींनी देशवासींयाशी संवाद साधला. लस घेतल्यानंतरही काऴजी घेणे गरजेचे आहे. लस घेतल्यानंतर मास्क लावणे, हात धुणे गरजेचे आहे, असे मोदींनी सांगितले. तीन कोटी लोकांना लस मोफत देणार येणार आहे. ज्येष्ठ व्यक्तींना दुसऱ्या टप्यात लस दिली जाणार आहे.
 
मोदी म्हणाले,  ''खूप दिवसापासून कोरोना लसीची प्रतिक्षा होती. प्रथम कोरोना योद्धांना लस देण्यात येणार आहे. ज्येष्ठ व्यक्तींना दुसऱ्या टप्यात लस दिली जाणार आहे. लस घेतल्यानंतरही काऴजी घेणे गरजेचे आहे. लस घेतल्यानंतर मास्क लावणे, हात धुणे गरजेचे आहे. लसीकरणासाठी राज्याकडून केंद्र सरकारला मदत मिळाली आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या खर्च सरकार उचलणार आहे. कोरोना काळात सरकारने अर्थव्यवस्थेपेक्षा लोकांच्या जीवनाला महत्व दिले.'' 

केंद्र सरकारने राज्यातील लसीकरण केंद्रांची संख्या कमी केल्याचा आरोप आरोग्यमंत्री राजेश टोपे नुकताच यांनी केला आहे. राज्याला अपेक्षेपेक्षा कमी डोस मिळाले आहेत.  या केंद्रामध्ये दिवसाला 20 ते 25 हजार जणांना लस दिली जाणार आहे. 

केंद्राच्या सुचनेनंतर लसीकरण केंद्राची संख्याही 511 वरुन 350 पर्यंत कमी करण्यात आल्याचं राजेश टोपे म्हणाले आहेत. ''कोरोना लसींचे दोन डोस घ्यायचे आहेत. ते एकाच कंपनीचे डोस असले पाहिजे. यासाठीची काळजी प्रशासन घेत आहे,'' असे टोपे यांनी स्पष्ट केले.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com