अजित पवारांकडून मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा.. - Happy Birthday to Modi from Ajit Pawar  | Politics Marathi News - Sarkarnama

अजित पवारांकडून मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा..

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 17 सप्टेंबर 2020

अजित पवार यांनी टि्वट करून मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधानांना निरोगी व दीर्घायुष्य लाभो, अशा सदिच्छा अजित पवार यांनी व्यक्त केल्या आहेत.

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस. यानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. याबाबत अजित पवार यांनी टि्वट करून मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधानांना निरोगी व दीर्घायुष्य लाभो, अशा सदिच्छा अजित पवार यांनी व्यक्त केल्या आहेत.

अजित पवार आपल्या टि्वटमध्ये म्हणतात की भारतासारख्या महान लोकसत्ताक देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींजी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! तुम्हाला निरोगी व दीर्घायुष्य लाभो, हीच सदिच्छा! महाराष्ट्राला तसंच समस्त देशवासियांना न्याय देण्याचं काम आपल्याकडून सदैव होईल, अशी अपेक्षा आहे.

प्रबोधनकार ठाकरे यांना अभिवादन
प्रबोधनकार ठाकरे यांच्या जंयतीनिमित्त अजित पवार यांनी त्यांना अभिवादन केलं आहे. पवार यांनी टि्वटकरून प्रबोधनकार ठाकरे यांना टि्वट करून अभिवादन केलं आहे. 'सुधारणावादी विचारांचे क्रांतिकारी नेते, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील आघाडीचं नेतृत्व स्व. केशव सीताराम तथा प्रबोधनकार ठाकरे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! समाजातील वाईट रुढी, परंपरा, जातीव्यवस्था, अस्पृश्यता, बालविवाह, केशवपन, हुंडाप्रथेविरुद्ध त्यांनी प्रखर लढा दिला,' असे अजित पवार यांनी टि्वटमध्ये म्हटलं आहे.    

हेही वाचा : आजचा वाढदिवस  पंतप्रधान नरेंद्र मोदी 
नरेंद्र दामोदरदास मोदी (जन्म : 17 सप्टेंबर 1950) हे भारतीय जनता पक्षाचे (भाजपचे) नेते आणि 26 मे 2014 पासून भारताचे पंतप्रधान आहेत. ते 7 ऑक्‍टोबर 2001 पासून 22मे 2014 पर्यंत गुजरातचे मुख्यमंत्री होते. भाजपच्या गुजरात विधानसभेच्या विजयांमध्ये मोदींचे मोठे योगदान होते. ते 2001 गुजरातचे मुख्यमंत्री झाले व त्यानंतर सरळ विधानसभा जिंकत मोदींनी मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार पाहिला. हिंदुत्ववादी विचारसरणीचे नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. ते संघाचे स्वयंसेवक आहेत. मोदी हे गुजरात राज्याच्या विकासासाठी ओळखले जातात. त्यांच्या अर्थकारणाची प्रशंसा सर्वत्र केली जाते. मोदी यांच्या वडिलांचे नाव दामोदरदास मूळचंद मोदी, तर आईचे नाव हिराबेन आहे. या दोघांच्या सहा अपत्यांपैकी नरेंद्र हे तिसरे अपत्य आहे. ते भारताचे अतिशय प्रभावी पंतप्रधान आहेत. जनतेशी थेट संवाद करणारे पंतप्रधान म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख