मोदीजींना मार्गदर्शन करणे म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखं...शेलारांची मुख्यमंत्र्यांवर टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना मार्गदर्शन करणे म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारख आहे," अशी टीका भारतीय जनता पक्षाचे नेते आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.
102uddhav_thakre_shelar_final_0.jpg
102uddhav_thakre_shelar_final_0.jpg

मुंबई : "शिवसेनेचा दसरा महामेळावा म्हणजे महाफ्लॅाप शो होतो. ५० लोकांसमोर ५० हजार लोंकाचा शो असल्यासारख करायचं. भाजपाच्या ताकदीची दहशत हे दडपण उद्धव ठाकरेंच्या भाषणात दिसून आले. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना मार्गदर्शन करणे म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारख आहे," अशी टीका भारतीय जनता पक्षाचे नेते आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.     

काल शिवसेनेच्या दसरा महामेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाना साधला होता. याबाबत भाजपचे नेते आशिष शेलार पत्रकारांशी बोलत होते. शेलार म्हणाले की विजयादशमीच्या दिवशी किमान वाईट कोणाला बोलू नये म्हणून काल आम्ही प्रतिक्रिया दिली नाही. शिवसेनेचा कालचा महामेळावा म्हणजे महाफ्लॅाप शो होतो. पन्नास लोकांसमोर ५० हजार लोंकाचा शो असल्यासारख करायचं. भाजपाच्या ताकदीची दहशत हे दडपण उद्धव ठाकरेंच्या भाषणात दिसून आली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संघ आणि शिवसेनेच्या हिंदुत्वाची तुलना केली आहे. मात्र, त्वचा आणि शाल यांची तुलना होऊ शकत नाही. तुम्ही वेळ आली कि हिंदुत्वाची शाल काढली. कृषी विधेयकाला पहिल्यांदा समर्थन नंतर सभागृहातून पळ हि शिवसेनेची दुटप्पी भूमिका आहे, असा आरोप शेलार यांनी केला आहे.  

आशिष शेलार म्हणाले, "हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा असं मुख्यमंत्री बोलतात. कारण तुमच्या मनांत इनसिक्युरीटी आहे. आमच तर म्हणणं आहे की उद्धव ठाकरे घराबाहेर पडून तरी दाखवा. जे कर्माने पडणार आहे, त्यांना धर्माने पाडायची गरज नाही. कोरोना योद्धाचे मनोबळ वाढविण्यासाठी आम्ही थाळ्या आणि टाळ्या वाजवायच्या नाही तर घरात बसून अंडी उबवायची आहेत का ? ज्यांना तुम्ही देश सांभाळा सांगताहेत तुम्ही किमान मुंबई तरी सांभाळा." 


हेही वाचा: मोदींचे पुतळे जाळणे हे राहुल गांधीच्या बेशरमपणाचे नाटक... 
 

नवी दिल्ली : पंजाबमध्ये दसऱ्यानिमित्त झालेल्या रावण दहनावेळी रावणाला पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मुखवटे चढविल्याच्या प्रकाराने भाजप संतप्त झाला आहे. पक्षाचेअध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी, हे राहूल गांधी दिग्दर्शित व निर्देशित बेशरमपणाचे नाटक होते, असे व्यक्तव्य करून हल्ला चढविला आहे. भारतीय राजकारणाची पातळी कॉंग्रेसने कधी नव्हे इतक्‍या खालच्या पातळीला आणून ठेवली, अशी टीका केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी 'सरकारनामा'शी बोलताना व्यक्त केली. पंजाब मधील या प्रकारावर नड्डा यांनी ट्‌विट केले आहे. ते म्हणाले की ही घटना लाजिरवाणी असली तरी नीराशेची टोकाची पातळी गाठलेल्या कॉंग्रेसच्या बाबतीत ती अनपेक्षित नाही. नेहरू-गांधी घराण्याने पंतप्रधान कार्यालयाचा सन्मान कधीही ठेवला नाही हे पुन्हा दिसून आले. 2004-2014 मध्ये तेच दिसले. त्यावेळी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाचा अध्यादेश टरकावून-फाडून टाकण्यापर्यंत या घराण्याची मजल गेली होती. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com