मावसभावांच्या लढतीत पवारांनी मारली बाजी...

प्रकाश पवारांच्या पॅनलनेसुभाष उमाप यांच्या पॅनलचा पराभव केला.
pp18.png
pp18.png

शिक्रापूर : जातेगाव बुद्रुक (ता.शिरूर) येथील ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालात माजी सभापती प्रकाश पवार व जिल्हा दुध संघाच्या संचालिका केशरताई पवार यांच्या पॅनलने बाजी मारली आहे. ४:५ अशा बलाबलाने निवडणूक जिंकलेल्या या निवडणूकीत पवारांच्या पॅनलने शिरुरचे माजी सभापती सुभाष उमाप यांच्या पॅनलचा पराभव केला. 

पवार व उमाप हे दोघेही सख्खे मावसभाऊ असून पुण्यातील माजी आमदार बापूसाहेब पठारे यांचे सख्खे भाचे असल्याने या निवडणुकीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. घोडगंगाचे माजी उपाध्यक्ष, शिरुर बाजार समितीचे सलग ११ वर्षे सभापती राहिलेले माजी सभापती प्रकाश पवार तसेच त्यांच्या भावजय जिल्हा दुध संघाच्या संचालिका केशरताई सदाआण्णा पवार, उद्योगपती व पुणे जिल्हा विकास मंचचे अध्यक्ष सदाशिवराव पवार यांचे मुळगाव हे जातेगाव बुद्रुक आहे. माजी सभापती सुभाष उमाप हा संपूर्ण परिवारही जातेगावचाच. 

दोन्ही परिवार राष्ट्रवादीशी कट्टर मात्र यावेळी पवार आणि उमाप अशाच पध्दतीने गावात ग्रामपंचायत निवडणूक लढविली गेली. यात उमाप यांच्या जय हनुमान पॅनल तर पवार समर्थकांचा गुरुदत्त ग्रामविकास पॅनल होते. गावात सुनंदा सुनिल होळकर या शिवसेनेच्या सदस्या निवडणूकीपूर्वीच बिनविरोध झाल्या. त्यामुळे आठ जागांसाठी झालेल्या या निवडणूकीत ४:४ असे बलाबल राहिले. मात्र, शिवसेनेच्या होळकर कुटुंबीयांनी सर्व निकाल जाहीर होताच आपला पाठींबा पवार गटाला जाहीर केल्याने निवडणूकीत पवार पॅनलने आपले वर्चस्व सिध्द केले. 

निवडणूकीत माजी सभापती सुभाष उमाप यांच्या पत्नी सुनंदा उमाप या निवडून आल्या आहेत. त्यांच्या समर्थनासाठी गावातील मोरे, इंगवले, खळदकर, वारे, सातपूते कुटुंबीयांनी पाठबळ दिले. पवार परिवारातील राहूल सुरेश पवार या प्रकाश पवार यांच्या पुतण्याने विजय मिळविला आहे. या पॅनलसाठी मोठे पाठबळ गावकारभारी रमेश फणसे, होळकर, खळदकर, क्षीरसागर आदी परिवारांनी पाठबळ दिले. 
 

दिलीप वळसेंसाठी दोन्ही गट आपलेच...!
राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांचे कट्टर समर्थक असलेल्या व याच खात्याचे आयुक्त कांतिलाल उमाप, नवी मुंबईचे उपायुक्त शहाजी उमाप यांचे गाव असलेल्या जातेगाव बुद्रुक (ता.शिरूर) येथे राष्ट्रवादीच्या दोन गटात जी लढत झाली. अर्थात निकाल काहीही लागले असले तरी दोन्ही गट वळसे-पाटील यांचेच समर्थक आहेत.  
  

सुभाष उमाप यावेळी इकडे...!
पाच वर्षांपूर्वी माजी सभापती पैलवान सुभाष उमाप व प्रकाश पवार या दोघांनी एकत्र येवून स्वतंत्र पॅनल केले होते. तर या दोघांच्या पॅनल विरुध्द उमाप यांचे वडील बाबुराव उमाप यांनी सातपूते, वारे, खळदकर आदी परिवारांना एकत्र करुन स्वतंत्र पॅनल केले होते. शिवाय ग्रामपंचायतीवर सत्ताही प्रस्थापित केली होती. यावेळी मात्र सुभाष उमाप यांनी स्वतंत्र पॅनल केले होते. ४:४ अशा बलाबलाने निवडणूकीत स्वत:च्या पत्नीच्या यशासह बिनविरोध उमेदवारासह निकालात बरोबरी साधली.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com