पुणे : "राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी राज्यात उत्तम सर्जरी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार हेच आमचे डॅाक्टर आहेत," असे मत शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी आज व्यक्त केली. संजय राऊत एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत बोलत होते.
संजय राऊत म्हणाले, "विधान परिषद निवडणुकीत आम्ही चांगली लढत दिली आहे. अमरावती मतदारसंघातील परावभावचे आम्ही आत्मचिंतन करू. धुळे नंदुरबार मतदारसंघातील विजयाचे श्रेय भाजपनं घेऊ नये. भाजपला यशाचं सातत्य नाही. पदवीधर, शिक्षक मतदारसंघ हे भाजप विचारांचे मतदारसंघ होते. त्यांच्या बालेकिल्ल्यातच त्यांचा पराभव झाला आहे, त्याचं आत्मचिंतन भाजपला करावं लागेल."
BHR गैरव्यवहार : एकनाथ खडसेंचे आरोप सुभाष देशमुखांनी फेटाळले...
#PoliticsInMaharashtra #राजकीय #महाराष्ट्र #Sarkarnama #Viral #ViralNews #राजकारण #MarathiNews #MarathiPoliticalNewshttps://t.co/dMZSu5bUQt
— Sarkarnama (@SarkarnamaNews) December 5, 2020
राऊत म्हणाले की भाजपचा जेव्हा जन्मही झाला नव्हता तेव्हा मुंबईची लढाई शिवसेनेनं एकहाती लढली आहे. मुंबई महापालिकेवरील भगवा झेंडा उतरविण्याची भाषा करणाऱ्या भाजपचा नागपूर, पुणे येथील झेंडा आम्ही उतरविला आहे. भगवा उतविण्याची भाषा त्यांना शोभत नाही.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याविषयी शरद पवार यांनी केलेल्या व्यक्तव्याचा सरकारशी काहीही संबंध नाही. पवारसाहेबांनी त्यांची व्यथा बोलून दाखविली आहे. त्यांच्या व्य़क्तव्याकडे काँग्रेसने मार्गदर्शन म्हणून पाहावं, असा सल्ला संजय राऊत दिला. दि्ल्ली येथील शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली. शेतकऱ्यांना पाठिंबा देण्याची भूमिका शिवसेनेची आहे, असे राऊत यांनी सांगितले.
हेही वाचा : वर्षभरात भाजपला दोनदा सुतक..शिवसेनेचा टोला
मुंबई : पदवीधर मतदारसंघातील भाजपचा पराभव झाला आहे. यावरून शिवसेनेचा भाजपवर निशाणा साधला आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना' तून भाजपवर टीका करण्यात आली आहे. "वर्षभरापूर्वी 105 आमदार येऊनही सत्ता गेली. तेव्हापासून महाराष्ट्र भाजपास सुतक लागले. कालच्या नागपूर-पुण्यातील पराभवाने आणखी एक सुतक लागले. एका वर्षात दोनदा सुतक लागणे हे हिंदू शास्त्रानुसार चांगले नाही. भाजपला काहीतरी तोड करावीच लागेल," अशी टीका शिवसेनेनं भाजपवर केली आहे. महाविकास आघाडीचे सरकार तीनचाकी आहे, अशी टीका भाजपसारखे विरोधक वर्षभर करीत होते. यावर ‘‘सरकारला चाके चारच आहेत, चौथे चाक जनतेच्या विश्वासाचे आहे,’’ असा टोला मुख्यमंत्री ठाकरे यांनी हाणला होता. तो विश्वास स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या शिक्षक, पदवीधर निवडणुकांनी खरा ठरवला. विधान परिषदेच्या सहा जागांसाठी निवडणुका झाल्या. त्यातील पाच जागा महाविकास आघाडीने जिंकल्या. धुळे-नंदुरबार विधान परिषदेची जागा काँग्रेसमधून भाजपात शिरलेल्या अमरीश पटेल यांनी जिंकली. अमरीश पटेल यांची अशा प्रकारच्या निवडणुका जिंकण्याची कार्यपद्धती किंवा कौशल्य ज्यांना माहीत आहे ते या विजयाचे श्रेय भारतीय जनता पक्षाला देणार नाहीत, असे अग्रलेखात स्पष्ट करण्यात आले आहे.
(Edited by : Mangesh Mahale)

