पोलिसांच्या बदल्यांचे पत्ते 30 सप्टेंबरपर्यंत पिसले जाणार

पोलिसांच्या बदल्यांतील दुकानदारी महाआघाडी सरकारने बंद केल्याचा दावा शिवसेनेच्या मुखपत्राने केल्याच्या दिवशीच बदल्यांसाठी पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे.
Anil Deshmukh-Devendra Fadnavis
Anil Deshmukh-Devendra Fadnavis

शिक्रापूर : राज्यभरात बदलीपात्र पोलिस अधिकारी व कर्मचा-यांच्या बदल्यांची प्रक्रीया कोरोनामुळे पुढे ढकलून अखेर ५ सप्टेंबर मुदत दिलेल्या महाआघाडी सरकारने आज तातडीने परिपत्रक काढीत या बदल्यांना आणखी २५ दिवसांची मुदतवाढ देवून ३० सप्टेंबर ही मुदत दिली आहे.

गेल्या दोन दिवसात राज्यभरातील ५० पेक्षा जास्त उपमहानिरीक्षक, महानिरीक्षक, अतिरिक्त पोलिस महासंचालक दर्जाच्या अधिका-यांच्या बदल्या झाल्या. मात्र पोलिस अधीक्षक, अतिरिक्त पोलिस अधीक्षक, उपअधीक्षक, निरीक्षक आणि कर्मचाऱी यांच्या बदल्या अद्याप शिल्लक आहेत. यासाठीची मुदत पाच सप्टेंबर रोजी संपत होती. काही हजार बदल्या यानिमित्ताने होणार आहे. मात्र त्या सर्वांना प्रतिक्षा करावी लागणार आहे. 

या बदल्या 15 आॅगस्टपर्यंत होणार होत्या. मात्र गणेशोत्सव झाल्याशिवाय बदल्या न करण्याची भूमिका पोलिस महासंचालक सुबोध जयस्वाल यांनी घेतली. त्यामुळे ही मुदत पाच सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आली. आता कोरोनाच्या संकटामुळे ती आणखी 25 दिवसांनी वाढविली. 

गणेशोत्सवानंतर तरी हमखास पोलिस अधिकारी तसेच बदलीपात्र कर्मचा-यांच्या बदल्या होतील अशी अटकळ संबंधितांना होती. जे चांगल्या पोस्टिंगकडे लक्ष ठेवून आहेत. त्यांच्या पदरी निराशा आली आहे.

पोलिसांच्या बदल्या या राजकीय वादाचा विषय झाला होता. सुरवातीला महाआघाडी सरकारच्या घटक पक्षांतील तीन पक्षांत मतभेद असल्याची चर्चा होती. विरोधी भाजपने बदल्यांचे दुकान मांडल्याची टीका केली. त्यानंतर सरकारने काही अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. त्यावरन पोलिसांच्या या बदल्यांवर मी योग्य वेळ येताच बोलणारच आहे, असा इशारा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. फडणविसांची टीका लक्षात घेऊन शिवसेनेच्या सामना मुखपत्रातून या विषयावर भाष्य करण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात या तिघांनी एकत्रित बसून बदल्यांचे पत्ते पिसले आहेत. इतक्या पारदर्शक पद्धतीने पहिल्यांदाच बदल्या झाल्या असतील, असा दावा `सामना`ने केला होता. हा अग्रलेख प्रसिद्ध झाल्याच्या दिवशीच बदल्यांना मुदतवाढ देऊन हे पत्त आणखी काही दिवस पिसले जाणार असल्याचे स्पष्ट झाले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com