सरकार पाच वर्ष टिकेल ; अंतर्विरोधाचे त्रांगडे होणार नाही...

राज्य सरकारमध्ये अंतर्विरोध कुणाला दिसत असेल तरी सरकार पाच वर्षाचा काळ पूर्ण करेल, असा ठाम विश्वास खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.
Sanjay Raut1
Sanjay Raut1

पुणे : राज्य सरकारमध्ये अंतर्विरोध कुणाला दिसत असेल तरी सरकार पाच वर्षाचा काळ पूर्ण करेल, असा ठाम विश्वास 'सामना' च्या 'रोखठोक' या सदरात खासदार संजय राऊत यांनीव्यक्त केला आहे. महाराष्ट्रातील 'ठाकरे सरकार' अंतर्विरोधाने पडेल, असे विरोधकांना का वाटते? तसे घडणार नाही. फडणवीस मुख्यमंत्री असताना सगळ्यात जास्त अंतर्विरोधाने प्रदर्शन
'शिवसेने- भाजप'मध्ये घडले तेव्हा सरकार टिकले. मंत्र्यांचे राजीनामे खिशात असतानाही ते तरले, मग आताच कसे पडेल, असा रोखठोक सवाल संजय राऊत यांनी विरोधकांना केलाआहे. 

सरकार पाडण्यात आम्हाला रस नाही, ते स्वतःच्या अंर्तगत भांडणातून पडेल, असे विधान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. याचा अर्थ असा होतो की सरकार पाडण्याचे आणि आमदार फोडण्याचे सर्व प्रयोग कोसळले आहेत. त्यामुळे तीन पक्षात काही फाटेल आणि सरकार पडेल, अशी आशा विरोधी पक्षाना आहे. गेल्या पंधरा दिवसात मुंबईपासून
दिल्लीपर्यंत राज्य सरकार पडेल, अशी वावटळ उठली त्याबाबतचा धुराळा अजूनही उडत आहे. 

शरद पवार हे ठाकरे सरकार स्थापन करणारे प्रमुख नेते आहेत. सरकारच्या भवितव्याबाबत तेच फक्त सांगू शकतात. ठाकरे सरकार स्थिर असल्याचे ते कायम सांगत आहेत. महाआघाडीतील कॅाग्रेस पक्षाचे चित्तही विचलित झालेले नाही. महाविकास आघाडीतील आमदारांतील कोणी घोडेबाजार उभे राहिेले नाही. त्यामुळे हे ठाकरे सरकार पडेल, असे विरोधकांना वाटणे चुकीचे आहे. अंतर्विरोध किती असला तरी सरकारला धोका नाही. कारण हे सरकार टिकायला हवे ही घटक पक्षातील प्रत्येक पक्षाची मजबूरी असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले.  

पवार हे सरकारचा गोवर्धन करंगळीवर तोलून आहेत... 

महाराष्ट्रात कोरोनागस्तांची संख्या वाढत आहे, राज्य सरकार कोरोनाशी मुकाबला करण्यात अपयशी ठरले, राज्यात राष्ट्रपती शासन लागू करावे, असा विचार जे करीत असतील तर ते आत्मघातकी असल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले आहे. राज्यातील सध्याचे सरकार तीन पक्षाचे आहे. 170 आमदारांचे पाठबळ या सरकारला कायम आहे. त्यामुळे राजभवनात सरकार
पाडण्याचे कारस्थान सुरू आहे, या भ्रमातून बाहेर पडायला पाहिजे, असे राऊत यांनी स्पष्ट केले आहे. ठाकरे सरकार चालविणे ही तीन पायांची शर्यंत आहे.  पण ज्यांनी आघाडी सरकार चालवून दाखविले, असे शरद पवार हे 'ठाकरे सरकार'चा गोवर्धन करंगळीवर तोलून आहेत. त्यामुळे अंतर्विरोधाचे त्रांगडे होणार नाही, असे राऊत यांनी स्पष्ट केले आहे.


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com