'रेमेडीसीवीर'बाबत सरकारने 'दिल और दिमाग' वापरावा...

कोरोनावर उपयुक्त ठरणाऱ्या रेमेडीसीवीर या इंजेक्शनचा काळाबाजार रोखण्यासाठी उत्पादक कंपन्यांनी केवळ सरकारमार्फत हे इंजेक्शन रुग्णालयांना पुरवावे, अशी व्यवस्था करता येईल.
4gopal_shetty_40bjp_mp_0.jpg
4gopal_shetty_40bjp_mp_0.jpg

मुंबई : कोरोनावर उपयुक्त ठरणाऱ्या रेमेडीसीवीर या इंजेक्शनचा काळाबाजार रोखण्यासाठी उत्पादक कंपन्यांनी केवळ सरकारमार्फत हे इंजेक्शन रुग्णालयांना पुरवावे, अशी व्यवस्था करता येईल. मात्र, त्यासाठी राज्य सरकारने संवेदनशीलता व अक्कलहुशारी (दिल और दिमाग) दाखवली पाहिजे, असा टोला उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी लगावला आहे. 

हे इंजेक्शन काळ्याबाजारात 40 ते 50 हजार रुपयांना मिळत असल्याच्या तक्रारी रुग्णांकडून आल्याने शेट्टी यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उद्देशून एक ध्वनीचित्रफीत समाजमाध्यमांवर प्रसिद्ध केली आहे. हे इंजेक्शन अत्यंत परिणामकार आहे, मात्र आता ते मिळत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे उत्पादक कंपन्यांनी केवळ सरकारमार्फतच ती इंजेक्शन रुग्णालयांना पुरवावीत, अन्य कोणीही विक्रेता, वितरकमध्ये आणू नये, अशी व्यवस्था करता येईल.

या इंजेक्शनचे रोज किती उत्पादन होते, ही आकडेवारी सरकारला सहज मिळू शकेल, ते काम फारसे कठीण नाही. ज्याप्रमाणे सरकारने साथ रोग कायद्यान्वये हॉटेल, शाळा- महाविद्यालये, सभागृह ताब्यात घेतली, तसेच हे काम देखील करता येईल. फक्त त्यासाठी सरकारकडे संवेदनशीलता व अक्कलहुशारी (दिल और दिमाग) हवी. त्याने काम सोपे होईल व गरजू रुग्णांना हे इंजेक्शन मिळण्याची व्यवस्था करता येईल, असेही शेट्टी यांनी म्हटले आहे.

कोरोनाचा देशभरातील प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून, आता रूग्णसंख्या साडेआठ लाखांच्या घरात पोचली आहे. यातील १ लाखांपेक्षा जास्त रूग्ण राजधानी दिल्लीत आहे. यातील आशादायी बाब म्हणजे, सक्रिय रुग्णसंख्येत तब्बल १८ टक्‍क्‍यांनी घट होणारे दिल्ली हे देशातील एकमेव राज्य ठरले आहे. जुलैच्या मध्याला संसर्गाचा उच्चांक गाठणाऱ्या कोरोनाचा प्रवास आता जास्त रुग्णसंख्या असलेल्या राज्यांकडून वैद्यकीय पायाभूत संरचना दुर्बल असलेल्या अन्य राज्यांकडे, महानगरांकडून छोटी शहरे आणि ग्रामीण भागाकडे सुरू झाल्याचे दिसून येत आहे. रूग्णसंख्या वेगाने वाढणाऱ्या राज्यांमध्ये आता महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात, तमिळनाडू यांच्या बरोबरीने उत्तर प्रदेश, कर्नाटक, आसाम, ओडिशा, बिहार, राजस्थान या राज्यांचाही समावेश झाला आहे. 

गेल्या आठवड्यात उत्तर प्रदेश, कर्नाटक, आसाम, ओडिशा, बिहार, राजस्थान या राज्यांत रुग्णसंख्या ५० ते ८० टक्‍क्‍यांनी वाढली आहे. दिल्लीमध्ये 3 जुलैला २६ हजार ३०४ एवढी सक्रिय रुग्णसंख्या होती. मागील चोवीस तासांत हाच आकडा २१ हजार ५७६ झाला आहे. या दरम्यान राष्ट्रीय पातळीवरील सक्रिय रुग्णसंख्या २१.७ टक्‍क्‍यांनी वाढली आहे. हरियाना व तमिळनाडूतही सक्रिय रुग्णसंख्या राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी आहे. 

 Edited  by : Mangesh Mahale


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com