मुंबई : "वाढीव वीजबिलाच्या माफीबाबत सरकारनं पुन्हा घुमजाव केलं आहे. याबाबतचे निर्णय कोण घेतं. मुख्यमंत्री कोण ? अजित पवार की उद्धव ठाकरे याचा सरकारनं खुलासा करावा," अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. राज्यातील विविध प्रश्नांबाबत आंबेडकर आज पत्रकार परिषदेत बोलत होते.
अॅड. प्रकाश आंबेडकर म्हणाले, "जनतेनं वाढीव वीजबिल भरू नये, तुमचा वीजपुरवठा खंडीत केला तर वंचित बहुजन आघाडी पून्हा वी़ज जोडून देईल. वाढीव वीजबिलाबाबत वंचितने आंदोन केलं आहे. आता वाढीव वीजबिल भरू नको, याबाबतचे आंदोलन तीव्र करण्यात येणार आहे. घरगुती वापरण्याची गॅसची फाईल अर्थमंत्र्यांकडे गेली कशी, असा सवाल अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
'ठाकरे सरकार हे सैतानी सरकार आहे. तुम्हाला मदत हवी असल्यास पवारांच्या घरी उपोषणाला बसा..' असे विधान प्रकाश आंबेडकर यांनी नुकतेच केलं होत. हिंगोली जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या आणि सरकारने दिवाळी पूर्वी दिलेले फसवे आश्वासन यावरून आंबेडकरांनी राज्य सरकारला सैतानाची उपमा दिली आहे. "तुम्हाला मदत हवी असेल तर अजित पवारांच्या घरी उपोषणाला बसावे लागेल, कारण तुम्ही माणसांना सत्ता दिली नाही तर सैतानाला सत्ता दिली आहे, आता या सैतानाला माणसात आणायचे असेल तर, स्मशानभूमीतील सांधुकडे तुम्हाला जावे लागेल," असा खोचक टोला देखील आंबेडकर यांनी नुकताच लगावला होता.
`मूड ऑफ नेशन`, भाजपच्या बाजूने, पदवीधर निवडणूकीतही ते दिसेल.. https://t.co/LnWGJUAUUp
— Sarkarnama (@SarkarnamaNews) November 23, 2020
हेही वाचा भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटलांना शिवेसेनेकडून ऑफर...
अहमदनगर : राज्यात भाजप आणि शिवसेना यांच्यात जोरदार संघर्ष सुरू आहे. सध्या पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत शिवसेना, भाजपने कंबर कसली आहे. निवडणुकीच्या प्रचाराला जोर आला आहे. शिवसेनेचे नेते आणि राज्याचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी भाजपचे नेते आणि माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे दोन्हीही श्रीरामपूरमध्ये एकाच मंचावर आले होते. त्यावेळी सत्तार यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांना मोठी ऑफर दिली असल्याची चर्चा राजकीय वतुर्ळात आहे. श्रीरामपूर येथे पंचायत समितीच्या नुतन इमारतीचे अब्दुल सत्तार यांच्या हस्ते भुमिपूजन पार पडलं. या कार्यक्रमाला राधाकृष्ण विखे पाटील, शिवसेना खासदार सदाशिव लोखंडे उपस्थित होते.
(Edited by : Mangesh Mahale)

