सरकार उद्योजक चालवितात..आशिष शेलारांची खोचक टीका - Government is run by entrepreneurs bjp leadar Ashish Shelar criticism | Politics Marathi News - Sarkarnama

सरकार उद्योजक चालवितात..आशिष शेलारांची खोचक टीका

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 17 फेब्रुवारी 2021

लाँकडाऊन लागू करण्याच्या विचारात राज्य सरकार असल्याची चर्चा आहे. यावरून शेलार यांनी सरकारला धारेवर धरले.  

मुंबई : भाजपचे नेते आशिष शेलार यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. सध्या कोरोनाचे रूग्ण वाढत आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा लाँकडाऊन लागू करण्याच्या विचारात राज्य सरकार असल्याची चर्चा आहे. यावरून शेलार यांनी सरकारला धारेवर धरले.  

आशिष शेलार म्हणाले, "राज्यात योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळे साडेचार लाख कर्मचारी लसीकरणापासून वंचित राहिले. सध्या कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे सरकार पुन्हा लाँकडाऊनची भाषा वापरत आहे. पण ही परिस्थिती का निर्माण झाली. याचं उत्तर सरकारनं दिलं पाहिजे."  

"एकीकडे लाँकडाऊनची भाषा वापरतात, आणि दुसरीकडे पब, बार 1 वाजेपर्यंत सुरू ठेवतात, असा विरोधाभास का, असा सवाल आशिष शेलार यांनी सरकारला विचारला आहे. अधिकाऱ्यांकडून उद्योजकांच्या गाड्या वापरल्या जात असल्याची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे आली आहे. त्यामुळे सरकार, उद्योजक की विकसक चालवितात का, अशी खोचक टीका शेलार यांनी केली आहे.

काँग्रेसचं युवकांसाठी ‘डेटिंग डेस्टिनेशन’.. 

भाजपच्या आयटी सेलची चैाकशी करणार असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलं आह. याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना शेलार म्हटले की भाजप कोणत्याशी चैाकशीला घाबरत नाही. भाजपच्या आयटी सेलनं कधीही अनाधिकृत काम केलं नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळपेची म्हणजे महाराष्ट्र सरकार, अशी टीका शेलार यांनी केली आहे.  
 

हेही वाचा : मुख्यमंत्रीपद लाटताना द्विधा मन:स्थिती नव्हती..?

मुंबई : टिकटाँकस्टार पूजा चव्हाण हिच्या मृत्यूप्रकरणाशी शिवसेनेचे नेते संजय राठोड यांचा संबंध असल्याचा आरोप भाजपने केला आहे. यावरून भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. याबाबत भातखळकर यांनी टि्वट केलं आहे. आपल्या टि्वटमध्ये भातखळकर म्हणतात की, युतीला मिळालेला जनमताचा कौल डावलून लाचारीने मुख्यमंत्रीपद लाटताना फक्त द्विधा मन:स्थिती नव्हती. बाकी वनमंत्री संजय राठोडांवर कारवाई करताना मात्र मुख्यमंत्र्यांची मन:स्थिती नेहमीप्रमाणे द्विधा झाली आहे म्हणे, ही मनस्थिती द्विधा नसून निर्लज्ज आणि निबर मनस्थिती आहे.

राज्यात काही दिवसात वाढत चालेल्या गुन्हेगारीबाबत अतुल भातखळकर म्हणतात, "महाराष्ट्रात आता दरोडेखोर पोलिसांचा गणवेश घालून दरोडे टाकू लागले आहेत. घरबसलेल्या मुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्र्यांना भारतरत्नांची चौकशी, भाजपच्या आयटी सेलची चौकशी अशा महत्वपूर्ण कारवायांमुळे असल्या किरकोळ गुन्ह्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही." शेतकरी आंदोलनाबाबत भातखळ आपल्या टि्टवमध्ये म्हणतात की राकेश टिकैत यांच्या आंदोलनाचे शेतकरी हिताशी काहीही देणे घेणे नाही, हे आंदोलन मोदी सरकारच्या द्वेषाने पछाडलेले आहे.   
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख