पडळकरांच्या आटपाडीतील 140 कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश?

राज्याच्या राजकारणात लक्ष घालणाऱ्या पडळकर यांना त्यांच्या आटपाडी तालुक्यातच रोखण्याची तयारी राष्ट्रवादी काँग्रेसने सुरू केल्याचे दिसते.
gopichand padalkar supporters left the bjp and joins ncp in atpadi taluka
gopichand padalkar supporters left the bjp and joins ncp in atpadi taluka

विटा (सांगली): भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याचे प्रकरण ताजे असतानाच राष्ट्रवादीने पडळकरांचे प्रभावक्षेत्र असलेल्या आटपाडी तालुक्यात पक्षबांधणीवर जोर दिला आहे. या वादाच्या पार्श्वभुमीवर पडळकरांच्या दुसऱ्या फळीतील 140 कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याचा दावा करण्यात आला आहे.

राज्याच्या राजकारणात लक्ष घालणाऱ्या पडळकर यांना त्यांच्या आटपाडी तालुक्यातच रोखण्याची तयारी राष्ट्रवादी काँग्रेसने सुरू केल्याचे दिसते.  शरद पवार यांच्याबद्दल अपशब्द वापरल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून मोठ्या प्रमाणात पडळकर यांचा निषेध करण्यात आला. भाजपच्या नेत्यांनीही 'पडळकर यांचे विधान त्यांचे व्यक्तीगत विधान आहे. त्याचा पक्षाशी काही संबंध नाही' अशी भूमिका घेतली. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, भाजपचे नेते माजी मंत्री सुभाष देशमुख, लक्ष्मण ढोबळे या नेत्यांसह अनेकांनी 'पडळकर चुकले 'अशाच प्रतिक्रिया दिल्या. रावसाहेब दानवे, मधुकरराव पिचड यांनीही 'पडळकर यांचे बोलणे चुकीचे आहे.' असे सांगितले.  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पडळकर दिलगिरी व्यक्त करतील असे सांगितले पण अद्याप पडळकर यांनी दिलगिरी व्यक्त केलेली नाही. याचदरम्यान पडळकर यांना त्यांच्या तालुक्यातच रोखण्यासाठी राष्ट्रवादीने प्लॅन आखला आहे. त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये घेऊन त्याची एक चुणूक पक्षाने दाखवली आहे.

माजी आमदार सदाशिवराव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष ऍड बाबासाहेब मुळीक यांच्या उपस्थितीत गोपींचंद पडळकर यांना मानणाऱ्या 140 कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. तसा दावा पक्षाने केलेला आहे.

सुरुवातीला शरद पवारांनी धनगर समाजाला आरक्षण दिलेले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी बारामतीत पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत धनगर समाजाच्या एसटी प्रवर्गात समावेश करण्याचे आश्वासन दिले होते पण समाजाचा भ्रमनिरास झाला आहे. भाजप फसवा पक्ष आहे हे लोकांच्या लक्षात आले आहे. त्यामुळे लोक आता भाजपला सोडचिठ्ठी देत आहेत. आटपाडी तालुक्यातही भाजपला कंटाळून अनेक लोकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. 
-बाबासाहेब मुळीक,
कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस सांगली

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com