वस्त्रोद्योगातील घटकांना व्याज दरात सवलत द्या...

वस्त्रोद्योगातील घटकांना व्याज दराच्या सवलत योजनेची अंमलबजावणी होण्यासाठी सहकारी बँकांना आदेश देण्यात यावेत." अशी मागणी माजी खासदार राजू शेट्टी यांनी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे केली आहे.
raju-sheti.jpg
raju-sheti.jpg

पुणे : "इचलकरंजीसह राज्यातील वस्त्रोद्योग व्यवसायातील विणकर समाजातील साधे यंत्रमाग, वायडिंग, सायझिंग, प्रोसेस, अ‍ॅटोलूम आदी वस्त्रोद्योगातील घटकांना व्याज दराच्या सवलत योजनेची अंमलबजावणी होण्यासाठी सहकारी बँकांना आदेश देण्यात यावेत." अशी मागणी माजी खासदार राजू शेट्टी यांनी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे केली आहे. माजी खासदार शेट्टी यांनी सहकारमंत्री पाटील यांना याबाबत निवेदन दिले आहे.  

"कोविड 19 च्या संकटाने जगभर थैमान घातले आहे. भारतातही कोरोना व्हायरसाच्या प्रभावाने जनता जीवाच्या आकांताने भयभित झाली आहे. अशा भयंकर परिस्थितीत सरकार व प्रशासन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करीत आहे. आपल्या सतर्क व सक्षम प्रयत्नाने जिल्ह्यातील परिस्थिती नियंत्रणात ठेवली आहे. नैसर्गिक आपत्तीच्या काळात विविध उपाय योजनांनी परिस्थिती नियंत्रणात आणणे हे जसे महत्वाचे तसे विस्कळीत झालेले जनजीवन व उद्योग-व्यापार सुरळीत करून ते पूर्वपदावर आणणेही तितकेच महत्वाचे व गरजेचे आहे. या आपत्तीच्या काळात संचारबंदी, लॉकडाउनचे आदेश देण्यात आले. यामुळे सर्व उद्योगधंदे, व्यापार जिथल्या तिथं ठप्प झाले. 

पॉवरलुमच्या चक्रावर चालणा-या वस्त्रनगरीची जनता हतबल झाली. यात पॉवरलुमधारकांचे अतोनात आर्थिक नुकसान झाले व अजूनही होत आहे. गेल्या काही वर्षापासून मंदी, महागाईमुळे पॉवरलुम उद्योग मेटाकुटीस आला असतानाच या कोरोनाने धंद्याची व उद्योजकांची अक्षरश: वाट लावली आहे. लॉकडाउनच्या काळात सरकारने उद्योगाला मदत म्हणून बँक कर्जांचे 6 महिन्यांचे हप्ते न भरण्याचा शासन निर्णय (जीआर) केला. लघु उद्योग सक्षमीकरण व विस्तारीकरणासाठी शासन कमीतकमी व्याज दराने कर्ज पुरवठा करीत असते. 

सध्या दुग्ध व इतर उद्योगाला 11.25 दराने कर्ज दिले जात होते, सध्याच्या परिस्थितीत बॅकांनी व्याज दर कमी करून 8.25%व्याज दर करून उद्योगाला आधार दिला आहे. वस्त्रोद्योग हाही लघुउद्योगच आहे. शेतीबरोबर सर्वात जास्त रोजगार देणारा, विविध करांतून सरकारला हजारो करोडोंचा महसूल देणारा व  निर्यातीतून मोठ्या प्रमाणात परदेशी चलन मिळवून देणा-या या लघु उद्योगाला आता कमीतकमी व्याज दराने कर्ज पुरवठा करण्याची गरज आहे.

आपण या सर्व परिस्थितीचा गांभिर्याने व सकारात्मक विचार करून या वस्त्रोद्योगाला त्याच्या पडत्या काळात सावरण्यासाठी विणकर समाजातील साधे यंत्रमाग, वायडिंग, सायझिंग, प्रोसेस, अ‍ॅटोलूम आदी वस्त्रोद्योगातील घटकांना व्याज दरात सवलत योजनेची अंमलबजावणी करण्याबाबत सहकारी बॅंकाना आदेश देण्याची मागणी केली आहे. यावेळी प्रमोद मुसळे,अमोल डाके, प्रशांत सपाटे,किरण पवार , आण्णा दबडे,  सुशिल पाटील यांचेसह पदाधिकारी उपस्थित होते.
Edited  by : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com