4girish_mahajan_bjp_jamner_3.jpg
4girish_mahajan_bjp_jamner_3.jpg

गिरीश महाजन म्हणाले, "कोरानाबाधितांना आता 'या' ठिकाणी नेण्याची गरज नाही..."

उपजिल्हा रूग्णालयामध्ये कोरोना संसर्गाच्या पार्श्वभुमीवर ५० पाईपलाईनद्वारा ऑक्सीजनबेड प्रणाली कक्षाचा प्रारंभ महाजन यांच्या हस्ते करण्यात आला.

जामनेर (जळगाव) : तालुक्यातील कोरोना बाधीत मध्यम आणि गंभीर अवस्थेतील रूग्णांनाही जळगावला नेण्याची आता गरज भासणार नाही, अशी महत्वपूर्ण माहिती माजीमंत्री तथा आमदार गिरीश महाजन यांनी पत्रकारांना दिली. शहरातील उपजिल्हा रूग्णालयामध्ये कोरोना संसर्गाच्या पार्श्वभुमीवर ५० पाईपलाईनद्वारा ऑक्सीजनबेड प्रणाली कक्षाचा प्रारंभ  महाजन यांच्या हस्ते करण्यात आला.

त्यावेळी त्यांनी उपजिल्हा रूग्णालयात कोरोना रूग्णांसाठी उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या विविध सोयी-सुविधांची माहिती दिली. याप्रसंगी प्रांतधिकारी दिपमाला चौरे, तहसीलदार अरूण शेवाळे, नोडल अधिकारी डॉ. विनय सोनवणे, डॉ. आर. के. पाटील, डॉ. हर्षल चांदा, डॉ. प्रशांत महाजन, डॉ. जयश्री पाटील, तालुका वैद्यकीय अधीकारी डॉ. राजेश सोनवणे, पालिकेचे मुख्याधीकारी राहुल पाटील, पोलीसनिरीक्षक प्रताप ईंगळे, आरोग्य सेवक अरविंद देशमुख आदी होते.

जामनेर,पहुर येथे ८० बेडची व्यवस्था झाली

जामनेरसह तालुक्यातील पहुर येथे या प्रणालीच्या माध्यमातून सुमारे ८० बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी २०/२५ ऑक्सीजन सिलेंडरचीही उपलब्धता करून देण्यात आली. या उपक्रमासाठी सुप्रीम पाईप कंपनीने आपल्या सीएसआर निधीमधूनही मोलाची मदत करून दिली, शिवाय अन्य सामाजीक संस्थांनीही कोवीड संकटाचा सामना करण्यासाठी पुढाकार घेतल्याचे सांगून शहरात लवकरच १०० बेडचे नॉनकोवीड सेंटर जीएम हॉस्पिटलच्या  माध्यमातूनही तालुकावासीयांना येत्या चार-पाच दिवसात सेवा मिळणार  असल्याचेही आमदार गिरीश महाजन यांनी सांगितले.  

जळगाव जिल्ह्यात ‘कोरोना’चा संसर्ग वाढत आहे. शहरातही त्याचे प्रमाण वाढत आहे, त्यामुळे पाहणी करण्यासाठी केंद्रीय समिती आज जळगावात दाखल झाली आहे. शहरात महापालिकेतर्फे सुरू करण्यात आलेल्या कोविड सेंटरमध्ये उपचार करणारे महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यासह पाच डॉक्टर व तीन लॅब असिस्टंट पॉझीटीव्ह आल्याने उपचारासाठी आता डॉक्टरांची आवश्‍यकता निर्माण झाली आहे. केंद्रीय समितीकडे डॉक्टरांची मागणी करण्यात आली आहे. जळगाव जिल्ह्यात ९ हजार ४५१ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर आतापर्यंत ४६० जणांचा मृत्यू झाला आहे. 

जळगाव शहरातही कोरानाची मोठ्या प्रमाणात लागण झाली आहे.  अनेक भाग कटेन्टमेंट झोन झाले आहेत. जळगाव शहरात २४४२ जण कोरोना बाधित आहेत. महापालिकेतर्फे शहरात शासकीय तंत्र निकेतन तसेच आय.टी.आय येथे कोविड केंद्र सुरू करण्यात आले आहेत. मात्र, आता या कोविड केंद्रांतील उपचार करण्याऱ्या डॉक्टरांनाही कोविडची लागण आहे. त्यामुळे उपचाराची समस्या निर्माण झाली आहे. 
Edited by : Mangesh Mahale   

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com