फातिमाची झाली गीता अन् निघाली नायगावची राधा वाघमारे...

पाकिस्तानातून पाच वर्षांपूर्वी भारतात परतलेल्या गीताला अखेर तिचे कुटूंब भेटले आहे.
Geeta reunites with her family in india returned five years ago from pakistan
Geeta reunites with her family in india returned five years ago from pakistan

नवी दिल्ली : पाकिस्तानातून पाच वर्षांपूर्वी भारतात परतलेल्या गीताला अखेर तिचे कुटूंब भेटले आहे. मूकबधिर असलेली गीता महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील नायगावची असून तिचे खरे नाव राधा वाघमारे असल्याचे समोर आले आहे. गीताला सांभाळणाऱ्या पाकिस्तानी सामाजिक संस्थेने हा दावा केला आहे. या संस्थेचे सुरूवातीला तिचे नाव फातिमा ठेवले होते.

गीता १०-११ वर्षांची असताना भारत-पाकिस्तान सीमेवरील समझोता एक्सप्रेसमध्ये एका रेल्वे स्टेशन परिसरात सापडली होती. ती मूकबधिर असल्याने तिला काहीच सांगता येत नव्हते. त्यामुळे तिला पाकिस्तानच्या ईधी फाऊंडेशन या सामाजिक संस्थेमध्ये ठेवण्यात आले. संस्थेच्या बिलकिस ईधी यांनी गीता नायगावची असल्याचा दावा केला आहे. गीता आपल्या संपर्कात असून ती आपल्या कुटूंबापर्यंत पोहचल्याचे त्यांनी म्हटले आहे.  

ईधी फाऊंडेशनने गीताचे नाव सुरूवातीला फातिमा असे ठेवले होते. पण तिच्या पाया पडण्याच्या कृतीवरून ती हिंदू असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे मग तिला गीता हे नाव देण्यात आले. तत्कालीन परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या प्रयत्नातून २०१५ मध्ये गीताला भारतात आणण्यात आले. तसेच त्यांनी गीताला कुटूंबियांपर्यंत पोहचविणार असल्याचे आश्वासनही त्यांनी दिले होते. 

२०१५ मध्ये अभिनेता सलमान खानचा 'बजरंगी भाईजान' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. गीता आणि या चित्रपटाची कथा मिळती-जुळती असल्याने गीता चर्चेत आली होती. गीता भारतात आल्यानंतर तिला कुटूंब शोधण्यासाठी जवळपास पाच वर्षांचा कालावधी लागला. भारतात आल्यानंतर गीताला इंदूरच्या एका संस्थेत ठेवण्यात आले होते. ईधी या संस्थेकडून गीताशी सतत संपर्क ठेवला जात होता.

महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील नायगाव येथे गीताचे कुटूंब असल्याचे स्पष्ट झाले. तिचे खरे नाव राधा सुधाकर वाघमारे असल्याचेही समार आले आहे. डीएनए चाचणीमध्ये पुष्टी करण्यात आल्याचे संस्थेने स्पष्ट केले आहे. गीताच्या वडिलांचा काही वर्षांपूर्वी मृत्यू झाला असून तिच्या आईने दुसरे लग्न केले आहे, असे बिलकिस यांनी सांगितले. 

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com