121 मदरशांमधील शिक्षकांच्या वेतनासाठी 1 कोटी 80 लाख

मदरशांमधील विद्यार्थ्यांना क्रमिक अभ्यासक्रमातील गणित, विज्ञान, समाजशास्त्र, भाषा इत्यादी विषयांचे शिक्षण देण्यासाठी डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना राबविण्यात येते.
fund of one crore eighty lakhs allotted for madrasa teachers
fund of one crore eighty lakhs allotted for madrasa teachers

मुंबई : डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेअंतर्गत राज्यातील 121 मदरशांमधील शिक्षकांच्या वेतनासाठी 1 कोटी 80 लाख रुपयांचा निधी वितरीत करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

मदरशांमधील विद्यार्थ्यांना क्रमिक अभ्यासक्रमातील गणित, विज्ञान, समाजशास्त्र, भाषा इत्यादी विषयांचे शिक्षण देण्यासाठी डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना राबविण्यात येते. धार्मिक शिक्षण घेणाऱ्या मुलांना क्रमिक अभ्यासक्रम शिकण्यास व त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यास या योजनेतून प्रोत्साहन देण्यात येते. या योजनेतून संबंधीत मदरशामध्ये पायाभूत सुविधा, ग्रंथालय तसेच क्रमिक अभ्यासक्रम शिकविणाऱ्या शिक्षकास मानधन देण्यात येते. तसेच मुख्य प्रवाहातील शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या मदरशांतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येते.

या योजनेमधून ठाणे जिल्ह्यातील 13 मदरशांसाठी 18 लाख रुपये, वाशिम जिल्ह्यातील 12 मदरशांसाठी 21 लाख रुपये, बुलडाणा जिल्ह्यातील 2 मदरशांसाठी 1 लाख 40 हजार रुपये, औरंगाबाद जिल्ह्यातील 80 मदरशांसाठी 1 कोटी 16 लाख 40 हजार रुपये, जालना जिल्ह्यातील 7 मदरशांसाठी 13 लाख 80 हजार रुपये, परभणी जिल्ह्यातील 3 मदरशांसाठी 4 लाख 80 हजार रुपये, हिंगोली जिल्ह्यातील एका मदरशासाठी 1 लाख 20 हजार रुपये तर वर्धा जिल्ह्यातील 3 मदरशांसाठी 4 लाख रुपये असे एकुण 1 कोटी 80 लाख 60 हजार रुपये अनुदान हे शिक्षकांच्या मानधनासाठी वितरीत करण्यात येणार आहे. यासंदर्भातील शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून निधी लवकरच वितरीत होईल, असे मंत्री मलिक यांनी  सांगितले.

मुख्यमंत्री वाढदिवस साजरा करणार नाहीत!

मुंबई  : 'आपण वाढदिवस साजरा करणार नसून सध्याच्या कोरोना परिस्थितीत कुणीही कार्यालयात किंवा निवासस्थानी भेटून शुभेच्छा देण्याचा आग्रह धरू नये. तसेच हार तुऱ्यांऐवजी मुख्यमंत्री सहायता निधीस सढळ देणगी द्यावी. नियम पाळून आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करावीत', असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेस केले आहे. 

आपल्याला दिलेल्या शुभेच्छा या सर्व कोविड योद्ध्यांना समर्पित करीत आहोत असेही ते म्हणाले. २७ जुलैस आपल्या वाढदिवशी कुणीही जाहिरात फलक, भित्तीपत्रके लाऊ नये किंवा गर्दी करण्याचा प्रयत्न करू नये असेही मुख्यमंत्री म्हणतात. गेल्या ४ महिन्यांभपासून राज्य सरकार नागरिक, स्वयंसेवी संस्थांच्या सहभागाने कोरोनाची लढाई लढत आहे आणि आपल्या प्रयत्नांमुळे काही चांगले परिणामही दिसत आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.

Edited by swarup jankar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com