"ठाकरे सरकार म्हणजे बोलाचा भात आणि बोलाची कढी.." ...राणेंचा टोला - Former MP Nilesh Rane again targeted Chief Minister Uddhav Thackeray | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पूरग्रस्तांना तातडीची मदत; घरात पाणी शिरलेल्यांना १० हजार, अन्न धान्याचे नुकसान झालेल्यांना ५ हजार रुपय मिळणार. वडेट्टीवार यांची घोषणा
सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदार व खासदारांचे एक महिन्याचे वेतन पुरग्रस्तांना देण्यात येणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगलीत दिली.

"ठाकरे सरकार म्हणजे बोलाचा भात आणि बोलाची कढी.." ...राणेंचा टोला

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 30 ऑक्टोबर 2020

आम्ही शेतकऱ्यांसाठी कर्ज काढू सांगणारे ठाकरे सरकारचे मंत्री कुठे गेले?? प्रत्येक वेळेला केंद्राकडे बोट दाखवायचं असेल तर मंत्रालय पण दिल्लीला हलवा.," असे निलेश राणे म्हटले आहे.

पुणे  : भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार निलेश राणे यांनी पुन्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाना साधला आहे. "ठाकरे सरकार म्हणजे बोलाचा भात आणि बोलाची कढी.. नुस्त बोलबच्चन. पंचनामे झाले आता पुढे काय?? आम्ही शेतकऱ्यांसाठी कर्ज काढू सांगणारे ठाकरे सरकारचे मंत्री कुठे गेले?? प्रत्येक वेळेला केंद्राकडे बोट दाखवायचं असेल तर मंत्रालय पण दिल्लीला हलवा.," असे निलेश राणे म्हटले आहे.

निलेश राणे यांनी याबाबत टि्वट करून मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. महाराष्ट्रावर शिवसेनेचा एकहाती भगवा फडकेल या दृष्टीने आतापासूनच तयारीला लागा, असे आदेश शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या जिल्हाप्रमुखांना दिले होते. राज्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस यांच्या सहकार्याने सरकार बनवून मुख्यमंत्री झालेले उध्दव ठाकरे यांच्या या वक्तव्यावर टीका होत आहे. याबाबत आपल्या नेहमीच्या शैलीत शरद पवार यांनी  भगवा फडकणार असे मी गेल्या कित्येक वर्षांपासून ऐकत आहे, असे म्हणाले होते.

दुसऱ्या एका टि्वटमध्ये निलेश राणे म्हणतात, "महाविकास आघाडीचे सरकार इतकं पुळचट आहे की न्यायालय त्यांना साधी तारीख सुद्धा देत नाही. ७ ऑक्टोबर नंतर घटनापीठ तरी स्थापन करा हे सांगण्यासाठी काल परत अर्ज केला. ९ सप्टेंबरला दिलेला आदेश पण अजून पर्यंत घटनापीठ स्थापन झाली नाही ही लायकी ठाकरे सरकारची आणि नुकसान मराठा समाजाचं. "

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे कौतुक करताना भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. निलेश राणे म्हणतात की मानलं पवार साहेब आपल्याला महिनाभर कौतुक करता आणि एक दिवसात वर्षभराची उतरून टाकता. पवार साहेबांनी एका वाक्यात कान टोचले व कानपटीत पण दिली अशा शब्दांत राणे यांनी निशाना साधला आहे. 

अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या शेतीचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालं आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंपासून राज्यातील अनेक मंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर गेले होते. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना दहा हजार कोटीचं पॅकेजही जाहीर केलं होतं. मात्र, शेतकऱ्यांना अद्यापही नुकसान भरपाई मिळाली नसल्याचा दावा निलेश राणे यांनी केला असून त्यावरुन राज्य सरकारवर टीका केली आहे. 
 

हेही वाचा : महाराष्ट्राचे मंत्री बांधणार काळ्या फिती : सीमावासियांच्या भावनांची दखल
 
बेळगाव :  बेळगावसह सीमाभागात पाळल्या जाणाऱ्या काळ्या दिनाला पाठिंबा म्हणून १ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्राचे सर्व कॅबिनेट व राज्यमंत्री दंडाला काळी फित बांधून कामकाज पाहणार आहेत. गुरुवारी (ता. २९) महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. सीमा समन्वय मंत्री एकनाथ शिंदे यांनी ही माहिती दिली आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या युवा आघाडीने महाराष्ट्र सरकारला पत्र पाठवून महाराष्ट्रातही निषेध व्हावा, अशी विनंती केली होती. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख