"आम्ही साधूसंत नाही.." असे अजित पवार का म्हणाले ?

"ठाकरे सरकारच्या बजेटमध्ये नवीन असे काहीच नाही," अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
ap8.jpg
ap8.jpg

मुंबई : "ठाकरे सरकारने आज अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात शेतकरी, वीजबिल याबाबत काहीही घोषणा करण्यात आलेली नाही. ठाकरे सरकारने केलेल्या योजना या केंद्र सरकारच्याच आहेत. यात नवीन असे काही नाही," अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. हा अर्थंसंकल्प निराशाजनक असल्याचे फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. याला अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. अर्थसंकल्प हा जनतेच्या हिताचा असल्याचे पवार यांनी नमूद केले. 

कर्जबाजारी शेतकऱ्यांना मदत करणार असे आघाडी सरकारने सांगितले होते, पण या बजेटमध्ये शेतकऱ्यांना एकही पैसा देण्यात आलेला नाही, अशी टीका फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर केली आहे. "शेतकऱ्यांना प्रोत्साहनाचा पैसा दिला जाईल. त्यासंदर्भात एकाही पैशाची तरतूद करण्यात आलेली नाही. मूळ कर्जमाफीच्या योजनेमध्ये जवळजवळ 45 टक्के शेतकरी हे कर्जमाफीच्या योजनेपासून वंचित राहिले. त्यामुळे एकूणच ठाकरे सरकारची कर्जमाफी ही सर्वात फसवी कर्जमाफी ठरली आहे. यासोबतच शेतकऱ्यांना कुठलीही मदत, सोयाबीन करता नाही, कापसावरील बोंडअली करता नाही. शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारे मदत करण्यात आलेली नाही," असा आरोप फडणवीसांनी केला. 

यावर अजित पवार म्हणाले, "आता ज्या घोषणा आहेत त्या भाजपच्या घोषणा आहेत का ? त्यांची ही मक्तेदारी आहे काय ? आम्ही साधुसंत नाही, सरकार आपलं वाटेल, जनतेला कार्यक्रम आवडेल, तो कार्यक्रम आम्ही राबवणार, मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे , मग त्यासाठी तरतूद करायला नको का ? विरोधकांचा मुंबईवरच राग स्पष्ट होतो."

अजित पवार म्हणाले की, एक मेडिकल कॉलेज सुरू झालं की 700 बेडचं रुग्णालय सुरू होतात, त्याचा फायदा जनतेला होईल. यासाठी सिंधुदुर्ग, उस्मानाबाद, रायगड व साताऱ्यात वैद्यकीय महाविद्यालये सुरु करणार आहे. क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले मोफत विद्यार्थी प्रवास योजना सुरू करण्यात येणार आहे. २० हजार हायब्रीड बस सरकार देणार आहे. पोलीस दलातील स्वतंत्र महिला पोलीस गट स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. 
घरकाम करणाऱ्या महिलांना करीत संत जनाबाईंच्या नावाने असलेल्या योजनेला अडीचशे कोटींचा निधी मंजूर करण्यात आला.   

राज्याच्या आरोग्य सेवांमध्ये सुधारणा व वाढ करण्यासाठी ७५०० कोटींचा प्रकल्प तयार केला असून ४ वर्षांत पूर्ण केला जाईल. त्यात ट्राॅमा केअर, उपकेंद्रे, आरोग्य केंद्रे यांच्या बांधकामांचा समावेश आहे. आरोग्य आयुक्तालाच्या अखत्यारीत आरोग्य संचनालय स्थापन करुन दर्जेदार सुविधांसाठी ५ हजार कोटी रुपये देण्यात येतील. ८०० कोटी या वर्षी देण्यात येतील, असे पवार यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com