आधी लोकसभेची शाळा भरवा, मगच मुलांना शाळेत पाठवा...

"कोरोनावर अजून औषध सापडलेलं नाही. त्यामुळे कोणताही आईवडील आपल्या मुलांना शाळेत पाठवणार नाहीत,"
2Laxman_Dhobale_final_0
2Laxman_Dhobale_final_0

पुणे : मुलांना शाळेत पाठवण्याअगोदर विधानसभा आणि लोकसभेची शाळा भरवा. मगच पोटच्या गोळ्याला शाळेत पाठवा," असं माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी म्हटलं आहे.ते 'सरकारनामा'शी बोलत होते. "कोरोनावर अजून औषध सापडलेलं नाही. त्यामुळे कोणताही आईवडील आपल्या मुलांना शाळेत पाठवणार नाहीत," असेही ढोबळे म्हणाले. "जेव्हा लोकसभा आणि विधानसभा सुरू होतील तेव्हाच लोकांच्या मनात कोरोनाची भीती कमी होईल," असे ढोबळे म्हणाले.


"जीवघेण्या कोरोनावर औषध उपलब्ध नसताना कुणीही आपला पोटचा गोळा शाळेत पाठवायला तयार होईल, असे वाटत नाही. देशाची ही पुढची पिढी सक्षम राहिली पाहिजे याची जाणीव ठेवून शाळा सुरू केली पाहिजे," असे ढोबळे म्हणाले. "पोरग शाळेत गेलं तर कलेक्टर होईल हे पालकांना माहिती आहे, पण अशा असुरक्षित वातावरणात कोणताही पालक शाळेच्या फाटकाच्या आत पोराला पाठवण्याची हिंमत करणार नाही. एखाद वर्षे वाया गेलं तरी चालेल पण कोरोनाला लस सापडेपर्यंत कोणीही मुलाला शाळेत पाठवणार नाही," असं ढोबळे म्हणाले. "कोरोनाच्या काळात प्रत्येक आईने डॉक्टर झाले पाहिजे. हा आजार अवतीभोवती आहे याचं भान सतत ठेवून जाग राहिलं पाहिजे. आईने आपल्या पोटच्या गोळ्याला डॉक्टर बनून जपावे," असे आवाहन ढोबळे यांनी केले आहे.

"सरकारला शाळा सूरु करण्याची घाई झाली आहे. पण ज्या शाळेत मुलं जाणार आहेत. तिथं बाहेरून आलेल्या लोकांना विलगीकरण कक्षात ठेवले होते. शाळेत जाण्यापूर्वी त्या शाळेचे निर्जंतुकरण केले आहे का ?  मुळात शाळेत पाठवणे चुकीचे आहे. आज शिकवण्याची वेगळीवेगळी तंत्र आहेत. प्रत्येकाच्या  घरात मोबाईल आहेत. मुलांना डिजिटल पध्दतीने शिकवा, पण शाळेत पाठवण्याची घाई करू नका," असे ढोबळे यांनी स्पष्ट केले.  

हेही  वाचा :  "हे पॅकेज नव्हे, तातडीची मदत..." 

मुंबई : निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्याप्रमाणे रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यालाही फटका बसला आहे. संकटाचे परिणाम गंभीर असले तरी सरकार पूर्ण ताकदीने कोकणवासीयांच्या पाठीशी उभे राहील असे सांगून तातडीची मदत म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरीला ७५ कोटी रुपये व सिंधुदुर्गला २५ कोटी रुपये जाहीर केले. ठाणे व पालघर जिल्ह्यात तुलनेने कमी नुकसान झाले आहे. मात्र, तेथील परिस्थितीचा आढावा घेतला जाऊन मग निर्णय घेतला जाईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले. हे पॅकेज नसून तातडीची मदत आहे, असेही ते म्हणाले.

अशा नैसर्गिक आपत्तीत नुकसान भरपाईचे जुने निकष बदलण्याची गरज आहे. नवे सुधारित निकष कसे असावेत, त्याबाबत प्रशासनाने लवकरच माहिती सादर करावी म्हणजे निर्णय घेता येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. निसर्ग चक्रीवादळामुळे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर या जिल्ह्यातील झालेल्या नुकसानीचा आढावा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे घेतला. त्यांनी लोकप्रतिनिधीच्या सूचना ऐकल्या व प्रशासनाला योग्य ते निर्देश दिले. मुख्यमंत्र्यांनी सर्वाधिक फटका बसलेल्या रायगड जिल्ह्यास नुकतीच मुख्यमंत्र्यांनी भेट देऊन पाहणी केली होती. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com