पोलिसांच्या कामाच्या वेळा बदलणार...महासंचालकांचा आदेश... - Fifty percent presence of police Director General order | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पूजा चव्हाण मृत्यप्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा

पोलिसांच्या कामाच्या वेळा बदलणार...महासंचालकांचा आदेश...

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 24 फेब्रुवारी 2021

अ आणि ब श्रेणीतील पोलिस अधिकाऱ्यांना उपस्थिती पदसंख्येच्या शंभर टक्के राहिल. 

मुंबई : राज्यात कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता पोलिस कार्यालयात 50 टक्के हजेरीवर काम सुरू ठेवण्याची सूचना देण्यात आल्या आहेत. अ आणि ब श्रेणीतील पोलिस अधिकाऱ्यांना उपस्थिती पदसंख्येच्या शंभर टक्के राहिल. 

क आणि ड श्रेणीतील 25 टक्के कर्मचारी सकाळी 9 ते 4 आणि 25 टक्के कर्मचारी सकाळी 11 ते सायंकाळी 5 अशा शिफ्टमध्ये उपस्थित राहतील. क व ड श्रेणीतील पोलीस अधिकारी हे शक्यतो वर्क फ्रॉम होम करतील शिवाय तात्काळ सेवेसाठी फोनवर उपलब्ध असतील, असा आदेश राज्याचे अप्पर पोलीस महासंचालक संजीवकुमार सिंगल (प्रशासन) यांनी दिला आहे.  

पुणे जिल्ह्यात ११६८ जण पाँझिटिव्ह
पुणे शहरातील कोरोना संसर्गवाढीचा वेग वाढू लागला आहे. शहरात मंगळवारी (ता.२३) ६६१ नवे कोरोना रुग्ण सापडले आहेत. रुग्णांचे हे प्रमाण एकूण कोरोना चाचण्यांच्या तुलनेत प्रतिशेकडा १४ टक्के इतके आहे. म्हणजेच शहरात दररोजच्या एकूण चाचण्यांत प्रतिशेकडा १४ नवे रुग्ण सापडले आहेत. नवीन रुग्णवाढीची ही स्थिती याआधी तब्बल साडेचार महिन्यांपूर्वी म्हणजेच ९ आॅक्टोबर २०२० ला निर्माण झाली होती. त्यावेळी शहरात एकादिवसात ६९७ नवे रुग्ण आढळून आले होते. 

दरम्यान, जिल्ह्यात काल १ हजार १६८ नवे रुग्ण सापडले आहेत. याउलट ८०६ कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या दररोज सातत्याने नवीन रुग्णांच्या तुलनेत कोरोनामुक्त रुग्णांचे प्रमाण कमी होत असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या वतीने दररोज प्रसिद्ध करण्यात येत असलेल्या रुग्णांच्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे. शिवाय काल ८ जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण मृत्यूंपैकी शहरातील चार, पिंपरी चिंचवडमधील एक आणि जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील तीन जणांचा समावेश आहे.
 
पुणे शहरात काल ४ हजार ६०६ कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. ९
 आक्टोबरला ४ हजार ७८८ कोरोना चाचण्या घेण्यात आल्या होत्या. तेव्हा 
यापैकी ६९७ नवे रुग्ण सापडले होते. दरम्यान, शहरातील सर्वाधिक नवीन
 रुग्णांबरोबरच काल पिंपरी चिंचवडमध्ये २०४, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात
 २२४, नगरपालिका कार्यक्षेत्रात ६३ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात १६  रुग्ण सापडले आहेत.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख