पुण्यात येत्या आठवड्यापासून पंधरा दिवस लॅाकडाउन ...?

पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये पुढील आठवड्यात पंधरा दिवस लॅाकडाउन असण्याची शक्यता आहे.
0corona_23.jpg
0corona_23.jpg

पुणे : पुणे, पिंपरी चिंचवड मध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये पुढील आठवड्यात पंधरा दिवस लॅाकडाउन असण्याची शक्यता आहे. मात्र, लॅाकडाउन कधीपासून असणार याबाबत दोन्ही महापालिकेचे आयुक्त निर्णय घेणार आहे. याबाबत उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांनी आदेश दिला असल्याचे समजते.राज्य सरकारने कंटेन्मेंट झोन वगळता काही भागात लॉकडाऊन शिथिल केला आहे  मात्र, अद्यापही कोरोनाचा धोका टळलेला नाही. तरीही पुण्यात काही नागरिक कोणत्याही कारणाशिवाय घराबाहेर पडत आहेत. 

अनेक नागरिक मास्क न वापरता खुलेआम फिरत आहेत. त्यामुळे अशीच परिस्थिती कायम राहिल्यास प्रशासनाला आणखी कडक भूमिका घ्यावी लागेल. वेळप्रसंगी पुन्हा लॉकडाऊन घोषित करावा लागेल, असा इशारा
जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिला नुकताच दिला होता. दोन्ही शहरात आणि जिल्ह्यात अनेक नागरिक नियमांचं उल्लंघन करत नागरिक विनाकारण खुलेआम फिरत आहेत. नागरिक कोणत्याही कारणाशिवाय
मास्क न वापरता फिरत आहेत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी लॉकडाउन पुन्हा लागू करण्याचा इशारा दिला आहे. 

पुणे शहरासोबतच ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.  उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या आदेशानंतर पुण्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आयएएस अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कोरोनाबाबत उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी 4 आयएएस अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.


हेही वाचा : पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना मिळाला डिस्चार्ज 
  
पुणे : कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याने शहरातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार घेणारे पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना गुरुवारी (ता. 9 जुलै) डिस्जार्च देण्यात आला आहे. याबाबतची माहिती स्वतः महापौर मोहोळ यांनी ट्विट करून दिली आहे.कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसत नसल्याने रुग्णालयाने त्यांना घरी सोडले आहे. परंतु आगामी सहा दिवस म्हणजे 15 जुलैपर्यंत त्यांना होम क्वारंटाइन राहण्यास डॉक्‍टरांकडून सांगण्यात आले आहे. कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे महापौर मोहोळ यांना 4 जुलै रोजी मंगेशकर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचीही चाचणी करण्यात आली होती. त्यात कुटुंबातील आठ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे अहवालातून उघड झाले होते. कुटुंबांतील काही जणांवर रुग्णालयात, तर काहींवर घरीच उपचार सुरू आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com