भाजपच्या नेत्यांना या गावात प्रवेशबंदी... - farmer agitation charkhi dadri boycott bjp jjp in samaspur village imposed board entry ban on village entry | Politics Marathi News - Sarkarnama

भाजपच्या नेत्यांना या गावात प्रवेशबंदी...

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 3 फेब्रुवारी 2021

भाजप, जजपाच्या नेत्यांना गावात प्रवेशबंदी केली आहे. याबाबतचे फलक गावकऱ्यांनी वेशीवर लावले आहेत.

नवी दिल्ली : कृषी कायद्याविरोधात देशभरातील शेतकरी दिल्लीत रस्त्यावर उकरून आंदोलन करीत आहेत. केंद्र सरकारविरूद्ध शेतकऱ्यांच्या भावना अधिक तीव्र होत आहेत. याच पार्श्वभूमीवर हरयाणामध्ये दादरी जिल्ह्यातील चरखी गावात गावकऱ्यांनी भाजप आणि  उप-मुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांच्या जननायक जनता पार्टीच्या (जजपा) नेत्यांना गावात प्रवेशबंदी केली आहे. याबाबतचे फलक गावकऱ्यांनी वेशीवर लावले आहेत.

या दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी गावात प्रवेश करुन नये असा इशारा फलकावर देण्यात आला आहे. काही दिवसापूर्वी फोगट खाप येथीही शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी भाजप आणि जजपाच्या नेत्यांना गावात प्रवेशबंदी करण्यात आली आहे.

कोणत्याही परिस्थिती हे तीनही कायदे केंद्र सरकारने रद्द करावे, अशी भूमिका या शेतकऱ्यांनी घेतली आहे. या दोन्ही पक्षातील नेत्यांनी गावात प्रवेश केला तर त्यांची जाहीर मिरवणूक काढण्यात येईल, असे फलक लावण्यात आले आहेत.    
 

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी दुपारी दिल्ली-उत्तरप्रदेश सीमेवर शेतकरी आंदोलकांची भेट घेतली. शेतकरी नेते राकेश टिकैत यांची भेट घेत राऊत यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला. त्यानंतर त्यांनी  'गाझीपूर बॉर्डर, म्हारो टिकैत' असा मजकूर व दोघे हात उंचावत असलेले छायाचित्र ट्विट केले आहे. 

केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना शिवसेनेने लोकसभेत पाठिंबा दिला होता. तर राज्यसभेत विरोध केला होता. काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांनी मुंबईत मोर्चा काढला होता. महाविकास आघाडीचे नेते या मोर्चाला उपस्थित होते. या मोर्चाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले होते. तसेच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेही या मोर्चाला उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, हे दोघेही या मोर्चाला उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे शिवसेनेच्या भूमिकेबाबत संदिग्धता निर्माण झाली होती. 

मंगळवारी राऊत यांनी शिवसेनेचे खासदार आंदोलकांना भेटणार असल्याची माहिती दिली होती. त्यानुसार राऊत यांच्यासह शिवसेनेचे अन्य खासदार राकेश टिकैत यांना भेटले. या भेटीमध्ये त्यांनी शेतकरी आंदोलनाला शिवेसनेचा पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले. 

या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले, 'टिकैत यांना भेटल्यानंतर आमचा पाठिंबा असल्याचे सांगितले. सरकारने शेतकऱ्यांशी योग्य मार्गाने चर्चा करायला हवी. देश चालविण्यासाठी अहंकार उपयोगी पडत नाही,' अशी टीका त्यांनी मोदी सरकारवर केली. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख