"दम मारो दम"मध्ये आता बॅालीवुड कलाकारानंतर क्रिकेट खेळाडू..?   - Famous actresses claim cricketers, their wife also take drugs | Politics Marathi News - Sarkarnama

"दम मारो दम"मध्ये आता बॅालीवुड कलाकारानंतर क्रिकेट खेळाडू..?  

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 24 सप्टेंबर 2020

अभिनेत्री शर्लिन चोप्राने बॅालीवुडसोबत आता क्रिकेट खेळाडूचा संबध ड्रग्जशी असल्याचा दावा केला आहे.

पुणे : अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात ड्रग्जच्या अँगलचा तपास करणाऱ्या राष्ट्रीय अमली पदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्ती हिला अटक केली आहे. रियाचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला असून, तिची रवानगी भायखळा कारागृहात करण्यात आली. रियाने एनसीबीला दिलेल्या वीस पानांच्या जबाबात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. याचबरोबर बॉलीवूडमधील ड्रग्ज कनेक्शनही समोर आलं आहे. 

या पार्श्वभूमीवर आता अभिनेत्री शर्लिन चोप्राने बॅालीवुडसोबत आता क्रिकेट खेळाडूचा संबध ड्रग्जशी असल्याचा दावा केला आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना शर्लिन म्हणाली, "मोठ मोठे क्रिकेट खेळाडू आणि त्यांच्या पत्नी यादेखील ड्रग्ज घेत असल्याचे मी पाहिलं आहे," असा गोप्यस्फोट तिनं केला आहे. ड्रग्जसंबधी एनसीबीचे काम उत्तम असल्याचे शर्लिननं म्हटलं आहे. 

शर्लिन चोप्रा म्हणाली की बॅालीवुडमधील ज्या सुपरस्टार्संना आपण देवी-देवता मानतो, त्यांच्या खरा चेहरा आता समाजासमोर आला आहे. आता हे सुपरस्टार्स एनसीबीला चैाकशीत सांगणार की त्यांनी कधी आणि किती प्रमाणात ड्रग्ज घेत होते. 

शर्लिन चोप्राने सांगितलं की मी कोलकाता येथे कोलकाता नाइट राइडर्स (केकेआर)चा सामना पाहण्यासाठी गेली होती. सामना संपल्यानंतर आयोजित केलेल्या पार्टीत मी पाहिलं की अनेक क्रिकेट खेळाडू, बॅालीवुड सेलिब्रिटी ड्रग्ज घेत होते. हे दृश्य पाहून मला खूप आश्चर्य वाटलं. खेळाडू आणि त्यांच्या पत्नी त्याठिकाणी ड्रग्ज सेवन करीत होत्या. टीमचे मालक, त्यांचे मित्र ड्रग्ज सेवन करीत असल्याचा आरोप शर्लिन चोप्रानं केला होता.  

Edited  by : Mangesh Mahale   

"कंगनाची पण चैाकशी व्हायला पाहिजे.."
 पुणे : "कायदा सर्वासाठी समान आहे. सगळ्याना बाबत जो न्याय आहे. तशाच न्याय अभिनेत्री कंगना राणावत विषयी पाहिजे. ड्रग्ज घेतल्याची कबुली कंगनाने दिली आहे. त्यामुळे तिचीही चैाकशी व्हायला पाहिजे," असं मत विरोधीपक्षनेते भाजपचे नेते प्रविण दरेकर यांनी केली आहे. पुण्यात ते पत्रकारांशी बोलत होते. अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात बॅालीवुडमधील अनेक कलाकारांशी चैाकशी होत आहे. कंगना राणावतने जर ती ड्रग्ज घेतल्याची कबुली दिली असेल आणि याबाबत पुरावे असेल तर तिची चैाकशी एनसीबीने केली पाहिजे, असे दरेकर यांनी सांगितलं. बॅालीवुडमधील अनेक कलाकारांचा ड्रग्जशी संबध असल्याचा आरोप सध्या होत आहे. अनेक कलाकारांचे नाव समोर येत आहे. तर काहींना एनसीबीनं त्यांना चैाकशीसाठी नोटिस पाठविली आहे. राज्यातील महत्वाच्या मुद्यावरून जनतेचं लक्ष विचलित करण्यासाठी राज्य सरकार या ड्रग्ज प्रकरणाकडं सगळ्याचं लक्ष वळवित असल्याचा आरोप नवनीत राणा यांनी केला आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख