फडणवीस म्हणतात, 'सरकारमध्ये समन्वयाचा अभाव...'

महाविकास आघाडीतील घटक पक्ष आम्ही एकत्र असल्याचे म्हणतात, पण प्रत्यक्षात तसे दिसत नाही. समन्वयाचा अभाव असल्याने ते एक निर्णय घेऊ शकत नाही,'' अशी टिका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांनी केली आहे.
34Maha_Devendra_Fadnavis_must_0
34Maha_Devendra_Fadnavis_must_0

मुंबई : ''राज्य सरकारमध्ये समन्वयाचा अभाव आहे. महाआघाडीतील तीनही पक्षानी मुख्यमंत्र्याच्या पाठिशी उभं राहिलं पाहिजे. ही वेळ वाद करायची नाही. तर कोरोनाशी लढण्यासाठी एकत्र येण्याची आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्ष आम्ही एकत्र असल्याचे म्हणतात, पण प्रत्यक्षात तसे दिसत नाही. समन्वयाचा अभाव असल्याने ते एक निर्णय घेऊ शकत नाही,'' अशी टिका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांनी केली आहे. 

नवी मुंबई, पनवेल येथील कोरोना रूग्णालयांची पाहणी देवेंद्र फडणीस यांनी आज केली. त्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. फडणवीस यांनी राज्य सरकारच्या वाहन खरेदीवर यावेळी टिका केली. वाहन खरेदी ही सरकारची प्राथमिकता असू शकत नाही, असा टोला फडणवीस यांनी यावेळी लगावला. 

देवेंद्र फडणवीस म्हणाले की गेल्या महिन्यात कोरोना संक्रमणाचा वेग हा कमी होता. आता तो 30 ते 38 टक्के एवढा झाला आहे. कोरोना तपासणी करणाऱ्या लॅबची संख्या दुप्पट केली पाहिजे. नाहीतर अचानक कोरोना बाधिताची संख्या वाढली तर क्वारंटाइऩ सेंटरची संख्या वाढवावी लागेल. रॅपिट टेस्टची संख्याही वाढविली पाहिजे. व्हेटिंलेटरची संख्या वाढविली पाहिजे. व्हेटिलेटर खरेदी करण्याची पध्दत मंद गतीची आहे.  सध्या नॅान कोविड रूग्णालयाचा अडचणी दूर झाल्या पाहिजे. सरकारी कोविड रूग्णालयात बेड्सची संख्या अपूर्ण पडत आहे. 

नुकताच भाजपने जाहीर केलेल्या नव्या कार्यकारीणी बाबत ते म्हणाले, ''नव्या कार्यकारीणीबाबत कोणीही नाराज नाही. काही जणांची नावे राष्ट्रीय कार्यकारणीसाठी पाठविण्यात आली आहे. याबाबत लवकर निर्णय राष्ट्रीय पातळीवर घेण्यात येणार आहे.'' आयुक्ताच्या बदल्याबाबत ते म्हणाले, ''सध्याच्या परिस्थितीत बदल्या करणे योग्य नाही. आपले अपयश आयुक्तांच्या माथी मारण्याचा प्रकार सध्या सरकार करीत आहेत. मुख्यमंत्र्यांनी शरद पवार यांचा सल्ला ऐकावा.''


हेही वाचा : घरकामगारांसाठी शिवसेनेच्या नेत्यांनी बाह्या सरसावल्या... 

मुंबई : सरकारने आदेश देऊनही अनेक ठिकाणी मोलकरणी, मदतनीस, स्वयंपाकीणकाकू, वाहनचालक, सफाई कामगार, घरकाम करणारे आदींना इमारतीत मज्जाव करण्यात येत आहे. त्याविरोधात शिवसेनेच्या नेत्यांनी बाह्या सरसावल्या आहेत. अनेक नेत्यांनी सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांना समज दिली आहे. काहींनी या प्रकाराविरुद्ध आंदोलन करण्याचाही इशारा दिला आहे. 

हे कष्टकरी सामान्य स्तरातील असल्याने या अवैध निर्बंधांमुळे त्यांचा रोजगार हिरावला जात आहे व दुसरीकडे या मदतनीसांअभावी ज्येष्ठ नागरिकांचेही हाल होत आहेत. यासंदर्भात शिवसेना पदाधिकाऱ्यांकडे तक्रारी आल्यामुळे गोरेगाव पश्चिम येथील विधानसभा संघटक व माजी नगरसेवक दिलीप शिंदे यांनी हा प्रश्न शिवसेना स्टाईलने सोडविण्याचा इशारा दिला आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com