फडणवीस म्हणाले, "एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्यांची जबाबदारी सरकार घेणार का ? - Fadnavis said Will the government take responsibility for the suicides of ST employees  | Politics Marathi News - Sarkarnama

फडणवीस म्हणाले, "एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्यांची जबाबदारी सरकार घेणार का ?

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 9 नोव्हेंबर 2020

"जळगाव आणि रत्नागिरीच्या या दोन घटनांसाठी जे दोषी आहेत, त्यांच्यावर काय कारवाई करणार या आत्महत्यांची जबाबदारी सरकार घेणार का," असा सवाल  देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

मुंबई : तीन महिन्यापासून पगार न मिळाल्याने एसटीच्या दोन कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली आहे. आता तरी सरकारने जागे व्हावे. "एसटी कर्मचार्‍यांची कुटुंब अतिशय हलाखीच्या स्थितीत आहेत.जळगाव आणि रत्नागिरीच्या या दोन घटनांसाठी जे दोषी आहेत, त्यांच्यावर काय कारवाई करणार या आत्महत्यांची जबाबदारी सरकार घेणार का," असा सवाल विरोधी पक्षनेते, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला केला आहे. याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी टि्वट केलं आहे.  

आपल्या टि्वटमध्ये देवेंद्र फडणवीस म्हणतात, "वेतन न मिळाल्याने 2 एसटी कर्मचार्‍यांनी आत्महत्या केल्या,या अतिशय वेदनादायी,मनाला अस्वस्थ करणार्‍या घटना आहे.एसटी कर्मचार्‍यांच्या व्यथा आणि वेदनासंदर्भात सातत्याने पत्रव्यवहार करून सुद्धा राज्य सरकारने त्याकडे लक्ष दिले नाही. ऐन दिवाळीच्या तोंडावर ही 2 कुटुंब उघड्यावर आली आहेत."
 
जळगाव आणि रत्नागिरीतील दोन एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. जळगाव येथील वाहक मनोज चौधरी यांनी तीन महिन्यांपासून पगार न मिळाल्यामुळे आत्महत्या केली. या घटनेने संतापलेल्या कर्मचाऱ्यांनी जळगाव डेपो बंद ठेवत निषेध व्यक्त केला आहे. रत्नागिरी येथे पांडुरंग गदडे या एसटी कर्मचाऱ्याचा मृतदेह गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आल्यानंतर ही हत्या असल्याचा आरोप नातेवाईकांकडून केला जात आहे.

एस टी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न लॅाकडाउनपासून गंभीर बनला आहे. अनेकांना चार महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने अनेकांची आर्थिक परिस्थिती ढासळली आहे. वेतन न मिळाल्यानं जळगाव जिल्ह्यातील रायपूर कुसुम्बा गावातील रहिवासी आणि जळगाव एसटी महामंडळात वाहक पदावर काम करत असलेल्या मनोज चौधरी यांनी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. मृत्यूपूर्वी मनोज चौधरी यांनी लिहिलेल्या चिठीत एस टी महामंडळ आणि ठाकरे सरकार जबाबदार असल्याचं सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे. रत्नागिरी येथे एसटी कर्मचाऱ्याची ही हत्या की आत्महत्या हे पोस्टमॉर्टम झाल्यानंतर स्पष्ट होईल.  

एसटी कर्मचाऱ्यांना एक तासात एक पगार देणार, अनिल परबांची माहिती

मुंबई : आत्महत्यासारखं कठोर पाऊल उचलू नका. तात्पुरत्या संकटातून आपण नक्की मार्ग काढू.दुःखी होऊन अश्‍या कोणत्याही टोकाचं पाऊल घेऊ नये असे आवाहन राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांना केले आहे. गेल्या काही दिवसापासून थकित वेतनासाठी एसटीचे कर्मचारी आंदोलन करीत आहे. नोकरी करायची, घाम घाळायचा पण, हाता पगार नाही. कुटुंबाची आर्थिक ओडाताण होत असल्याने एसटी कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे.
या नाराजीतून आणि तणावामुळे कर्मचाऱ्यांने आत्महत्या केली आहे. एसटी कर्मचाऱ्याला यापूर्वी कधीही असे पाऊल उचलावे लागले नाही. एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळी आली तरी हातात पैसे नाहीत. त्या पार्श्वभूमी अनिल परब यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. 

आत्महत्येमुळे कुटुंबाला त्याचा त्रास होतो कुटुंब रस्त्यावर येत याकडे लक्ष वेधत परब म्हणाले, की दिवाळी आधी 1 पगार मिळेल आणि दिवाळीनंतर 1 पगार मिळेल पूर्णपणे सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात. बॅंकेकडे कर्जही मागितले आहे. टप्प्या, टप्प्याने सगळ्या गोष्टी होतील.आज 1 तासात 1 पगार आणि सणाचा अनुग्रह मिळेल असे आश्वासनही अनिल परब यांनी दिले आहे. 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख