फडणवीस सरकारने नाईक आत्महत्येची चौकशी दाबली..सचिन सावंताचा आरोप  - Fadnavis government suppresses Naik suicide probe .. Sachin Sawant's allegation | Politics Marathi News - Sarkarnama

फडणवीस सरकारने नाईक आत्महत्येची चौकशी दाबली..सचिन सावंताचा आरोप 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 13 नोव्हेंबर 2020

अन्वय नाईक यांच्या आत्महत्येच्या प्रकरणातील आरोपीचा भाजपाशी थेट संबंध असल्यानेच फडणवीस सरकारने आत्महत्येची चौकशी दाबली, असा आरोप काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी केला आहे.

मुंबई : दिवंगत अन्वय नाईक यांच्या आत्महत्येच्या प्रकरणातील आरोपीचा भाजपाशी थेट संबंध असल्यानेच फडणवीस सरकारने आत्महत्येची चौकशी दाबली, असा आरोप काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी केला आहे. अन्वय नाईक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील जमीन व्यवहाराबाबत भाजपच्या नेत्यांनी निशाणा साधला आहे. 

या प्रकरणावरून शिवसेनेचे नेते संजय राऊत आणि भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्यात 'सामना' रंगला आहे. "मुख्यमंत्र्यांमध्ये हिमंत असेल तर त्यांनी आरोपांचे उत्तर द्यावे," असे आव्हान किरीट सोमय्या यांनी आज पत्रकार परिषदेत केले आहे. गोस्वामी यांचा थेट भाजपशी संबंध, म्हणून फडणवीसांनी प्रकरण दाबले, असा आरोप सचिन सावंत यांनी केला आहे.  

“दिवंगत अन्वय नाईक आत्महत्येसाठी जबाबदार व्यक्तीला पाठीशी घालण्याच्या प्रयत्नात किरीट सोमय्या यांनी त्यांच्या जमीन व्यवहाराला मध्ये आणून आपली व भाजपाची हीन मानसिकता दर्शवली. रिपब्लिक चॅनेलमध्ये भाजपा खासदार राजीव चंद्रशेखर हे भागीदार होते. गोस्वामी यांचा भाजपाशी थेट संबंध आहे,” असा आरोप सचिन सावंत यांनी केला आहे.

“अन्वय नाईक यांच्या आत्महत्येचा व जमीन व्यवहाराचा संबंध काय? मराठी कुटुंबाची वाताहत झाली त्याचे सोमय्या यांना काहीही पडले नाही. फडणवीस सरकारने आत्महत्या प्रकरण दाबले कारण आरोपी भाजपा संबंधित आहे. भाजपासाठी काम करतो. भाजपा हा पक्ष महाराष्ट्र द्वेष्टा आहे हे स्पष्ट आहे,” असेही सचिन सावंत म्हणाले.

चंद्रकात पाटील यांनीही किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपांबाबत भाष्य केले. रश्मी ठाकरे आणि अन्वय नाईक यांच्यातील जमीन व्यवहार प्रकरण हे जाणीवपूर्वक समोर ठेऊन अर्णव गोस्वामी प्रकरणावरील लक्ष विचलीत करण्याचा प्रयत्न केला जातोय का? या प्रश्नावर पाटील म्हणाले, ''किरीट सोमय्या यांनी ठोस कागदपत्रे बाहेर काढली आहेत. ती खोटी वाटत असतील तर शिवसेनेने न्यायालयात जावे,"

अन्वय नाईक व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील जमीन व्यवहाराबाबत भाजपच्या नेत्यांनी निशाणा साधला आहे. या प्रकरणावरून शिवसेनेचे नेते संजय राऊत आणि भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्यात 'सामना' रंगला आहे. "मुख्यमंत्र्यांमध्ये हिमंत असेल तर त्यांनी आरोपांचे उत्तर द्यावे," असे आव्हान किरीट सोमय्या यांनी आज पत्रकार परिषदेत केले आहे. त्यावरुन शिवसेना नेते किरीट सोमय्यांना लक्ष्य बनवत आहेत. आज साताऱ्यात बोलताना चंद्रकांत पाटील यांनी सोमय्यांची पाठराखण केली.

अन्वय नाईक आणि ठाकरे परिवारामध्ये तीन हजार कोंटीचा जमीन गैरव्यवहार झाला असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. तसेच दहीसर, भूखड गैरव्यवहाराबाबत आमच्याकडे कागदपत्रे, पुरावे असल्याचे सोमय्या यांनी सांगितले. हिम्मत असेल संजय राऊतांनी यावर बोलावं, असं सोमय्या म्हणाले. संजय राऊत मुळ प्रकरणाला बगल देण्याचा प्रयत्न करीत आहेत. या कथित घोट्याळ्याप्रकरणी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे सोमय्या यांनी सांगितले.  'भूखंडाचं श्रीखंड करणारे हे सरकार आहे,' अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख